🌟पुर्णा तालुक्यात दि.१३ जुलै रोजी मौ.वाई (लासीना) ते श्री क्षेत्र फळा पायी दींडी सोहळ्याचे आयोजन....!


🌟हभप.ॲड.यादव महाराज डाखोरे वाईकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले दिंडीचे आयोजन🌟 


पुर्णा (दि.१२ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील वाई (लासीना) ते श्री क्षेत्र फळा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.१२ जुलै २०२३ रोजी ब्रम्हीभूत ब्रम्हचैतन्य स्वानंद सुख निवासी श्री संत मोतीराम महाराज यांच्या समाधी चे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात हभप.ॲड.यादव महाराज डाखोरे वाईकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.


गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी सकाळी ०६-०० वाजता वाई येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे या दिंडीचे चौदावे वर्ष आहे हि दिंडी ०७-०० वाजता पांगरा ढोणे १०-०० वाजता पुर्णा.११-०० वाजता. खुजडा.एकुरखा,०२-०० वाजता ताडकळस.०४-०० वाजता धानोरा काळे आणि ०६-०० वाजता श्री क्षेत्र फळा येथे पोहोचेल नंतर गोदावरी चे स्नान व दर्शन होईल तरी या दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन मारोतराव डाखोरे.श्रीरंग डाखोरे.रुस्तुमराव डाखोरे.ऊतम डाखोरे.माणिकराव डाखोरे. मौकींदा डाखोरे.मुंजाजी डाखोरे.लशमन महाराज.रामजी महाराज. जनार्दन डाखोरे. यांच्या सह गावकरी मंडळी वाई लासीना यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या