🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या......!


💥राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर पुन्हा एक वर्षांसाठी बंदी : केवळ कागदोपत्रीच का ? जनसामान्य पुन्हा प्रश्नार्थक मुद्रेत ?💥

 ✍️ मोहन चौकेकर*

 🔴 कल्याण-ठाकुर्ली दरम्यान लोकल खोळंबली, आईनं बाळ गमावलं; रेल्वे ट्रॅकवरून चालताना चार महिन्यांचं बाळ हातातून निसटले अन  पाण्यात पडले नाल्यात वाहुन गेले 

🔴 मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याण-कसारा रेल्वे सेवा ठप्प, साडे-चार तासांपासून कल्याण-कर्जत रेल्वे सेवाही बंद ; रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी आणि सिंहगड एक्स्प्रेस या ट्रेन आज आणि उद्या रद्द 

🔴 मुंबईला पावसानं झोडपलं! मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट, दोन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार ;  राज्यात पावसाचं धुमशान; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर 

🔴 संभाजीनगरची /औरंगाबादची दंगल कशी घडली ? पहिल्यांदाच अधिकृत माहिती समोर ; उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितला सर्व घटनाक्रम 

🔴 NDA च्या बैठकीनंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा; तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे गृहमंत्री अमित शाहांचे आदेश 

🔴  देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात,  ATS ची कारवाई ; 'मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांना पकडणारे पुण्याचे दोन 'सिंघम', 

🔴 बृहन्मुंबई महापालिकेचं 263 कोटींचं स्ट्रीट फर्निचर कंत्राट अखेर रद्द 

🔴 टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 11 कर्मचाऱ्यांना अटक, रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याचा आरोप 

🔴 बांगलादेशचा 120 धावांत खुर्दा, भारतीय महिलांनी केला हिशोब चुकता, मालिकेत 1-1 बरोबरी ; भारत-पाकिस्तानमध्ये 2 सप्टेंबरला लढत

🔴 लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसाठी खुशखबर, आता मालडब्याचे रूपांतर ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात करणार 

🔴 आंबेडकरी समाजातील 800 लोकांनी गाव सोडलं,बेडगच्या सरपंच, ग्रामसेवकास झेडपीकडून नोटीस,सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश

🔴 'कांद्याला भाव मिळू दे, सरकारला सुबुद्धी येऊ दे...' नाशिकचा कांदा बाबा अमरनाथ यांना अर्पण 

🔴 राज्यभरात मुसळधार! मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

🔴 कोसळधारा राज्यात मुसळधार पाऊस ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश

🔴 पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले; जगबुडी, वाशिष्ठीसह नद्यांचे पाणी वाढल्याने पुर परिस्थिती 

🔴 पालिकेतील 'स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या'ची लोकायुक्तांकडून चौकशी व्हायला हवी- आदित्य ठाकरे

🔴 विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गैरहजर; नाराज असल्याच्या चर्चांवर नितीशकुमारांचे स्पष्टीकरण

🔴 तिस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, हाय कोर्टाचा निर्णय केला रद्द

🔴 “एक दबंग मित्र आमच्या वाट्याला आला आहे”; शहाजी बापू पाटलांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतुक 

🔴 नरेंद्र मोदी अन् अजित पवार यांच्यात बंद खोलीत चर्चा...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे होते?

🔴 उद्धव ठाकरे अजित पवारांच्या भेटीला! कारण गुलदस्त्यात! शिंदे सरकारमध्ये पहिल्यांदाच महत्वाच्या नेत्याला भेटले

🔴 सीमा आणि सचिनच्या लव्ह स्टोरीचा The End; तिला परत पाकिस्तानात पाठवण्यात येणार

🔴 सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसीटी एक्सप्रेस, डेक्कन एक्स्प्रेस तसेच इंद्रायणी एक्सप्रेस या ५ रेल्वे गाड्या रद्द

🔴 संभाजी भिडेंच्या संभाजीनगर दौऱ्याला /औरंगाबाद  दौऱ्याला विरोध, आंबेडकर अनुयायींचा सभा उधळून लावण्याचा इशारा

🔴 राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर पुन्हा एक वर्षांसाठी बंदी : केवळ कागदोपत्रीच का ? जनसामान्य पुन्हा प्रश्नार्थक मुद्रेत ?

🔴 किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मी किळसवाणे व्हिडीओ बघत नाही'

🔴 सरकारने OTTसाठी काढले नवे नियम, शिवीगाळ आणि अश्लीलता करणार बंद

🔴 सेन्सेक्स पुन्हा नव्या शिखरावर! 67,100 वर उसळी, निफ्टी 19,800 वर

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या