🌟पुर्णेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी अशोक साबणे सेवानिवृत्त....!


🌟परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत साबणे हे ३३ वर्षांपूर्वी कारकून यापदावर रुजु झाले होते🌟

पुर्णा (दि.०२ जुलै २०२३) - पुर्णा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक अशोक एकनाथराव साबणे हे शुक्रवारी दि.३० जुनं रोजी ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत.

        परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत साबणे हे  ३३ वर्षांपूर्वी कारकून यापदावर रुजु झाले होते.त्यांनी जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना बँकेने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शाखा व्यवस्थापक पदांवर काम करण्याची संधी दिली.शुक्रवारी ते सेवानिवृत्त झाले.याप्रसंगी शाखेच्या वतीने बाजार समितीच्या सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आला होते.यावेळी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर, सरव्यवस्थापक राजेंद्र मोजकर, व्यवसापक अजय देशमुख, सचिन माळवटकर , मंगेश फुलारी, पंडीत विखे, तालुका इन्स्पेक्टर विठ्ठलराव काळे, लक्ष्मणराव बोबडे, बालाजी वैद्य, दादाराव पंडित, रमेश ठाकूर, साहेब भाकरे, सचिव नितीन देसाई,कोंडीबा सोनटक्के, प्रभाकर धवन आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अशोक साबणे व सौ.सुनिता साबणे या दाम्पत्याचा सेवानिवृत्ती निमित्त यथोचित गौरव करण्यात आला.प्रसंगी मान्यवरांनी साबणे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी हनुमान चट्टे, गजानन खुडे,मो.अशरफ, रामराव मुंगल, राहुल गायकवाड, श्रीकांत कदम, विठ्ठल सोनवणे, आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या