🌟नांदेड शहरातील प्रभात नगरात पहिल्याच पावसात रस्त्यावर घाणीचे साम्राज्य....!


🌟परिसरातील स्वच्छतेकडे मनपा प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत🌟


नांदेड (दि.१८ जुलै २०२३) - मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यानंतर, साधारणपणे एक महिन्याने आज सकाळपासून जोरदार पावसास सुरुवात झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसणारे चित्र आज बऱ्याच भागात पहायला मिळाले शहरातील विविध वस्त्यांमध्ये नाल्यांचे पाणी तुडुंब भरून वाहू लागले त्यामुळे रस्त्यावर घानीच साम्राज्य पहावयास मिळत आहे.


        आपला विकास व्हावा असे वाटत असेल तर आपल्या भागातील एक सत्ताधारी राजकारणी असावा अशी अपेक्षा प्रत्येक मतदारांची असते. पण सत्ताधारी आपला असून सुद्धा काही विकास होत नसतो याचा प्रत्यय प्रभात नगर वासियांना आजच्या पावसामुळे आलेला आहे. आज पावसाने रौद्र रूप धारण करून  सततधार बरसत होता. या पावसामुळे प्रभात नगर येथील विहाराच्या शेजारील नालितील पाणी रस्त्यावरून वाहू लागले त्यामुळे पावसाचे पाणी ओसरताच रस्त्यावर घान साचली आहे. या घाणीच्या साम्राज्यामूळ शेजारीच असलेल्या विहारात बसण्यासाठी नागरिकांना त्रास होत आहे. शेजारीच प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुद्धा आहे. शाळेतील मुलांच्या आरोग्यावर या घाणीच्या साम्राज्याचा परिणाम होणार आहे. या परिणामांची जबाबदारी कोणी घेणार आहे का ? असा सवाल त्रस्त नागरिक करत आहेत.

        या घाणीची योग्य ती विल्हेवाट लवकरात लवकर लावण्यात यावी आणि विहाराच्या शेजारील नालीमध्ये विद्युतवाहिनीचा जो खांब आहे त्याची दखल घेऊन पाण्यास मार्ग करून देण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या