🌟कार्यक्रमास सुप्रसिद्ध सिने अभिनेता मा.गगन मलिक यांची राहणार उपस्थिती🌟
पुर्णा (दि.०१ जुलै २०२३) - पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी दि.०३ जुलै २०२३ रोजी दुपारी १२-३० वाजता अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथे रो व पूज्य भदंत पै य्या वंश यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेशना बुद्ध मूर्तीचे वाटप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढ पौर्णिमेनिमित्त सकाळी साडेपाच वाजता त्रिरत्न वंदना पूजा परित्राण सूत्र पाठ संपन्न होईल.दुपारी ठीक 12.30 वाजता सामूहिक वंदना व पूजा विधि सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख धम्मदेशना भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो महासचिव अखिल भारतीय भिकू संघ महाराष्ट्र प्रदेश व पूज्य भंते पैया वंश यांची होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी थायलंड येथील मा. फ्रा चानेक अनुन ता प्रे चा , सुप्रसिद्ध सिने अभिनेता मा.गगन मलिक कॅप्टन नट्टकीट चाईचलेरमोंगखोन मा. सॉंगथांब के र्डकेन मा. चैथा वत चंथाब्लुं ग हे असणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.सिद्धार्थ हत्ती आंबिरे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश मा. जीवराज डापकर उपविभागीय अधिकारी गंगाखेड मा. चंद्रकांत कच्छवे मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र पूर्णा. मा. विकास सूर्यवंशी फिल्ड ऑफिसर बँक ऑफ महाराष्ट्र पूर्णा हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व धम्मप्रेमी उपासक उपासिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व धम्म सेवेत करत असलेल्या महिला मंडळांनी केलेली आहे......
0 टिप्पण्या