🌟राज्यातील जिल्हास्तरीय पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या बरखास्त.....!


🌟पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली घोषणा🌟

मुंबई : राज्यातील सर्व जिल्हास्तरीय पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे..हा आदेश तात्काळ लागू होईल.. 

पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी राज्यात जिल्हा आणि तालुका पातळीवर पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.. मात्र या समित्यांची मुदत संपल्याने राज्यातील सर्व जिल्हा स्तरीय समित्या बरखास्त करण्यात येत आहेत..

नवीन पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या लवकरच जाहीर करण्यात येतीलअसेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.. नवीन समित्यांमध्ये जिल्हास्तरावर एक निमंत्रक आणि एक समन्वयक अशी दोन पदं असतील.. तालुका स्तरावर देखील अशीच व्यवस्था असेल.. एका महिन्यात राज्यात नवीन समित्या स्थापन होतील.. नंतर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या