🌟गंगाखेड मतदार संघा बाबत चित्र स्पष्ट : भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले डॉ.रत्नाकर गुट्टेच आमचे उमेदवार.....!


🌟आ.डॉ.गुट्टे यांना अडचण येणार नाही, संतोष मुरकुटे प्रचारप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती🌟


परभणी (दि.२९ जुलै २०२३) : गंगाखेड विधानसभा मतदार संघातील आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आहे. भविष्यात ते आमचे उमेदवार असतील आ.डॉ.गुट्टे यांना अडचण येणार नाही. मुरकुटे हे त्यांचे प्रचार प्रमुख असतील असे विधान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.


               मातंग समाजाच्या ११ व्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त बावनकुळे हे शनिवारी दुपारी परभणीत दाखल झाले होते. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना बावनकुळे यांनी डॉ. गुट्टे यांच्या मैत्रीसह आगामी भूमिकेबद्दल प्रश्‍न विचारला होता. तेव्हा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी गुट्टे हे आमचेच उमेदवार असतील व मुरकुटे हे त्यांचे प्रचार प्रमुख असतील, असे विधान केले.

              ज्या पध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सर्व आमदार, खासदार अजिदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप सोबत आले. कालांतराने ज्येष्ठ नेते शरद पवार देखील विचार करतील, राज्याच्या व देशाच्या हिताकरीता सर्वच लोकांनी एकत्र आले पाहिजे, असेही मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या