🌟परभणी जिल्ह्यातील पुर्णेचा भुमीपुत्र सुशिल शिंदेंची फ्रान्सच्या हवाई कवायतीत लक्षवेधी...!


🌟पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साक्षीने 'बॅस्टिल डे परेड' : स्न्वॉड्रन लिडर सुशिल शिंदे यांचा सहभाग🌟

परभणी (दि.१५ जुलै २०२३) : परभणी जिल्ह्यातील पुर्णा नगरीचे भूमिपुत्र स्न्वॉड्रन लीडर सुशिल शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी (बॅस्टिल डे) पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या हवाई कवायतीममध्ये अन्य सहकार्यांबरोबर भारतीय हवाई दलाच्या राफेल या लढाऊ विमानाद्वारे चित्तथरारक कवायती सादर करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

पुर्णा तालुक्यातील सुशील शिंदे यांनी त्यांचे शिक्षण सातारा येथील सैनिकी शाळेतून २००७ मध्ये पुर्ण केले पाठोपाठ भारतीय हवाई दलात सामील होवून वैमानिकांचे शिक्षण पूर्ण केले. विशेषतः हवाई दलात अनेक लढाऊ विमाने उडवली. राफेल कंपनीचे विमान उडविले. याशिवाय जॅग्वार तसेच विविध प्रकारचे विमान उडविण्याचा अनुभव असणार्‍या शिंदे यांचा फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी १४ जुलै रोजी होणार्‍या लष्करी कवायतीमध्ये समावेश करण्यात आला. शिंदे यांनी या पूर्वीही युरोपातील काही देशांमध्ये हवाई दलाच्या कवायतीमध्ये भाग घेतला होता. दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स दौर्‍यावर होते. राष्ट्रीय दिनी होणार्‍या लष्करी कवायतीच्या या कार्यक्रमास ते फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या समवेत उपस्थित होते १७८९ च्या फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान बॅस्टाईल कारागृतील घटनांबाबतची संवदेनशिलता व्यक्त करण्यासाठी हा दिवस फ्रान्सचा राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो.

          यावेळी भारतीय सेना दल, हवाई दल, नौदलाच्या अधिकार्‍यांसह जवानांनी या परेडमधून सहभाग नोंदवला. विशेषतः हवाई कवायतीत भारतीय हवाई दलाचे तीन राफेल लढावू विमाने फ्रेंच विमानांसह सहभागी झाली होती. या फ्रान्सच्या लष्करी कवायती दरम्यान हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही प्रक्रियाही शिंदे यांच्यासह सहकार्‍यांनी पूर्ण केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या