🌟आंबेडकरी विचार प्राणपणे जपणारे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व प्रकाश कांबळे.....!


🌟आज प्रकाश कांबळे यांचा वाढदिवस या मंगल प्रसंगी त्यांना आयु आरोग्य बल वैभव प्राप्त होवो ही मनोकाना🌟

लेखक : श्रीकांत हिवाळे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते पॅंथर चळवळीतील अग्रणी सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत आदरणीय प्रकाश कांबळे यांचं समस्त जीवन आणि कार्य समाजासमोर प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक आहे मराठवाड्यातील आंबेडकरी व धम्म चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या पूर्णा शहरामध्ये त्यांचं बालपण गेलं वडील दिवंगत बन्सी कांबळे भारतीय रेल्वेमध्ये पुर्णा या ठिकाणी नोकरीस होते.

पाच दशकापूर्वी येथील बौद्ध समाजातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंबेडकरी व धम्म चळवळ गतिमान केले बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी अशोका विजयादशमी दिनी बौद्ध धम्माची दीक्षा देणारे पूज्य भदंत चंद्रमणी महाथेरो यांना 60 च्या दशकामध्ये पूर्णा शहरामध्ये ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्यासाठी आणलं होतं त्यामध्ये दिवंगत बन्सी कांबळे यांचे ही योगदान होतं.

आई दिवंगत गिरीजा आई कुटुंब  व स्तल प्रेमळ सदाचारी व नीतिमान होत्या या आदर्श व संस्कारक्षम दाम्पत्याच्या शिकवणुकीतून आदरणीय प्रकाश जी कांबळे यांच्या विचाराची जडणघडण झाली लेकराचे पाय पाळण्यात दिसतात या विचाराप्रमाणे ते बालपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे हजर जबाबी संभाषण व अभ्यासामध्ये शाळेमध्ये अव्वल होते. गौरवर्ण मजबूत बांधा राजबिंड देखण असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.

आपल्या या लाडक्या मुलांन खूप शिकावं व उच्च पदस्थ अधिकारी व्हावं ही त्यांची इच्छा अगदी विद्यार्थी दशे पासूनच भारतीय दलित पॅंथर चळवळीकडे ते आकर्षित झाले अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पॅंथरचे तरुण कार्यकर्ते प्रस्थापित मनुवादी जातीयवादी धर्मांध शक्ती विरुद्ध अन्याय अत्याचाराविरुद्ध तुटून पडत असत यामुळे पॅंथर चळवळीविषयी आंबेडकरी समाजाला बहुजन समाजाला आस्था वाटत असे.

यामध्ये उच्चशिक्षित तरुणांचा भरणा जास्त होता त्यामध्ये कवी साहित्यिक विचारवंत होते पद्मश्री कवी नामदेव ढसाळ ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ज.वी पवार राजा ढाले प्रा. अरुण कांबळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले माजी मंत्री गंगाधर गाडे माजी आमदार टी एम कांबळे एस एम प्रधान आदींसोबत त्यानंतर चळवळीला त्यांनी झोकून दिले. पॅंथर चळवळीत काम करत असताना त्यांनी आपले शिक्षण सुद्धा चालू ठेवले.

एम.ए.हिंदी या विषयांमध्ये ते प्रावीण्य या मध्ये उत्तीर्ण झाले अधिकारी व प्राध्यापकाच्या नोकऱ्या चालून आल्या परंतु त्यांनी स्वतःला पॅंथर चळवळीमध्ये झोकुन दिल.पायाला भिंगरी बांधल्या गत समाजामध्ये जाणीव जागृती चे काम अन्याय अत्याचारा विरोधात लढण्याचं काम चित्त्याच्या वेगाने ते करत असत.बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळाव म्हणून महाराष्ट्र मध्ये देशामध्ये जो लढा उभा राहिला त्यामध्ये संपूर्ण मराठवाड्याच समर्थ नेतृत्व त्यांनी केलं.

त्यांना नामांतर आंदोलनामध्ये नाशिकच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आल.त्यांच्यासोबत पूर्णा शहरातील बरेचसे पॅंथर तरुण माता भगिनी होत्या.नामांतर आंदोलनामध्ये त्यांच भाषण अंगाला शहारे आणणार अभ्यासपूर्ण असायचं.त्यांच्या भाषणाला मोठ्या प्रमाणावर मागणी असायची.मुंबईला ज्यावेळी मोर्चा निघायचा त्यावेळी पूर्णा येथून व संपूर्ण मराठवाड्यामधून हजारो लोक ते सोबत घेऊन जायचे.ते आल्यानंतर मोर्चाला सुरुवात व्हायची.असं उत्तम संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये होतं.

महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 1978 मध्ये दोन्ही सभागृहांमध्ये  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद असा ठराव बहुमताने मंजूर झाला.

त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उमटले.पुर्णा येथील बुद्ध विहार जाळण्याच व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा चंग नामांतर विरोधकांनी केला होता.यामध्ये जातीवादी धर्मांध मनोवादी विचारसरणीचे लोक सहभागी झाले होते.परंतु प्रकाश कांबळे व त्यांच्यासोबत असलेल्या पॅंथर तरुणांनी छातीचा कोट करून नामांतर विरोधकांना जातीयवादी धर्मांत विचारसरणीच्या लोकांना लावले.यावेळी हिंसकजमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.त्यामध्ये एक नामांतर विरोधक ठार झाला.तत्कालीन पोलीस अधिकारी दिवंगत लोखंडे साहेबांनी ही कार्यवाही केली.

1985 च्या दशकामध्ये भारतीय दलित पॅंथरची चळवळ पूर्णा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर होती.नगरपालिकेच्या निवडणुका भारतीय दलित पॅंथर ने लढविल्या व मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणले.नगरपालिकेवर दलित पॅंथरची सत्ता आणली.त्या काळामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे वास्तव्य पूर्णा शहरांमध्ये असायच.प्रकाश कांबळे नगरसेवक पदावर निवडून आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेचे ग्रंथालय समृद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

मुंबई पुणे औरंगाबाद येथून थोर महापुरुष समाज सुधारक यांच्या जीवन चरित्राची ग्रंथसंपदा कथा कादंबऱ्या दुर्मिळ ग्रंथ त्यांनी नगरपालिकेच्या ग्रंथालयाला आणले.नगरपालिकेमध्ये मागासवर्गीय कर्मचा ऱ्यांचा अनुशेष भरून काढला.पुर्णा शहराच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तुत्वाचा वेगळा ठसा त्यांनी उमटविला.गेल्या दोन दशकापासून पूर्णा शहरामध्ये भारतीय संविधान गौरव सोहळ्याचा आयोजन त्यांच्या कल्पक दूरदृष्टीतून प्रमुख संयोजनाखाली होत असते.

भारतीय संविधाना विषयी जनमानसामध्ये जाणीव जागृती व्हावी व त्या माध्यमातून संविधान संस्कृती या देशामध्ये रुजावी यासाठी संविधान गौरव समितीचे प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहेत.दिनांक दहा जुलै हा त्यांचा जन्मदिन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय  क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीकडून व सर्व सामान्य जनते कडून संविधान गौरव समिती बुद्ध विहार समिती व विविध पक्ष संघ टने कडून साजरा होत आहे..

.या मंगल प्रसंगी त्यांना आयु आरोग्य बल  वैभव प्राप्त होवो ही मनोकाना...!

शुभेच्छुक

श्रीकांत हिवाळे

अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ता.पुर्णा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या