🌟शेगावात पुन्हा एक चोरटा चोरीच्या पहिलेच रंजन तेलंग यांच्या जाळ्यात....!


🌟रेल्वे स्थानकावर झोपलेल्या प्रवाशांची झाडाझडती करणाऱ्याला रंजन तेलंग यांनी घेतले ताब्यात🌟

अकोला/शेगाव (दि.११ जुलै २०२३) - सविस्तर वृत्त असे की माना स्टेशन जवळ झालेल्या भुसखलन मुळे काल रात्री शेगाव स्टेशनवर एकही ट्रेन येणार नव्हती यामुळे स्टेशनवर प्रचंड प्रमाणात गर्दी होती याचाच फायदा घेत झोपलेल्या प्रवाशांची झाडाझडती करणाऱ्या एकावर ड्युटी वर असलेल्या आरपीएफ चे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांनी गुप्त नजर ठेवून योग्य वेळी त्याला ताब्यात घेतले चौकशी केली असता वरील आरोपी हा रिकोर्ड वरील आरोपी असल्याचे दिसून आले आरोपीचे नाव पता विचारल्या नंतर तो मोहम्मद सादिक मोहम्मद अख्तर उम्र 48 वर्ष पता मूर्तिजपुर बढ़ा बाजार पुलिया येथील समजले त्यानंतर तेलंग यांनी वरील आरोपीस जी आर पी शेगाव च्या ताब्यात दिले तिथे वरील आरोपी वर कलम 110 सीआरपीसी नुसार कार्यवाही करण्यात आली. 

प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांची ही या वर्षातील 22 वी कार्यवाही आहे हे विशेष.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या