🌟साहित्यिक डॉ.वेदप्रकाश डोणगावकर पुर्णेचे भुमीपुत्र🌟
परभणी (दि.१८ जुलै २०२३) - महाराष्ट्र साहित्य परिषद या १९०६ साली श्रद्धेय लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या संस्थेचा मानाचा पुरस्कार परभणी जिल्ह्यातील पुर्णेचे भुमीपुत्र तथा साहित्यिक डॉ.वेदप्रकाश डोणगावकर यांच्या 'भारतीय तत्त्वज्ञान' या पुस्तकाला मिळाला काल प्रदान करण्यात आला त्यांच्या 'भारतीय तत्वज्ञान' या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे काल दि.१७ जुलै २०२३ रोजी त्यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार तत्त्वज्ञान विषयातले श्रद्धेय प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर यांच्या नावाने देण्यात आला आहे त्याचाही विशेष आनंद आहे दुधात साखर म्हटल्याप्रमाणे कालचा हा पुरस्कार तुकाराम महाराजांचे वंशज आणि आपल्या महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानातलं आधारवड डॉ.सदानंद मोरे सर यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला याही पेक्षा महत्वाचे म्हणजे ज्यांनी एम.ए ला तत्त्वज्ञान शिकविले ते शिक्षक प्राचार्य नागोराव कुंभार सर आणि प्राध्यापिका माधवी कवी मॅडम यांच्यासमोर हा पुरस्कार स्विकारण्याचा त्यांचा आनंद द्विगुनीत झाला.
या कार्यक्रमासाठी आपल्या तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक डॉ. मोहनराव देशमुख, डॉ. सुधीर पिटके, मा जांगमावड सर आदी मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी बोलतांना डॉ.डोनगावकर म्हणाले की खरोखर कालचा हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे माझ्या लेखन कार्याला सदैव प्रेरित करणाऱ्या आणि कालच्या या पुरस्काराबद्दल शुभेच्छा देणाऱ्या आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असेही डॉ.वेदप्रकाश डोणगावकर म्हणाले.....
0 टिप्पण्या