🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषणाचा आज तिसरा दिवस : प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही🌟
परभणी/पुर्णा (दि.०६ जुलै २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी-कंठेश्वर,मौ.धोत्रा,कानडखेड या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करोडो रुपयांच्या निधीतून मोठ्या वाजत सुरुवात ऑगस्ट २०२१ मध्ये करण्यात आली सदरील कामांचा कालावधी फेब्रुवारी २०२३ मध्ये संपलेला असतांना देखील अद्याप पर्यंत ही कामे २५% देखील पुर्ण झालेली नाही या उलट पुर्वीचे थोडेफार चांगले असलेले रस्ते देखील या कामांचे कंत्राटदार व्हि.टी.पाटील इंजिनीअर्स अँड कंट्रक्शन औरंगाबाद यांनी अक्षरशः उखरून अस्तव्यस्त केल्यामुळे भरपावसाळ्यात संबंधित रस्ते रहदारीसह वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील तब्बल बारा कामे ज्यात पुर्णा तालुक्यातील सहा व पालम तालुक्यातील सहा कामांचा समावेश आहे ही सर्वच कामे कंत्राटदार व्हि.टी.पाटील इंजिनीअर्स अँड कंट्रक्शन औरंगाबाद यांच्या नावे देण्यात आलेली आहे परंतु संबंधित कंत्राटदाराने सदरील काम स्वतः नकरता स्थानिक पातळीवरील काही 'निमहकीम खतरेजान' वृत्तीच्या गुत्तेदारांना दिल्यामुळे या सर्वच कामांचा खेळ खंडोबा झाला आहे असे असतांना देखील संबंधित कंत्राटदाराला महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे मुख्य अधिकारी कृष्णा वाघ,कनिष्ठ अभियंता बाचेवाड हितसंबंध जोपासत सातत्याने वाचवण्याचा केवीलवाना प्रयत्न करीत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची देखील चौकशी करावी तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कोट्यावधी रुपयांच्या कामांप्रमाणेच पुर्णा नगर परिषदेत अंतर्गत शहरातील तब्बल ०९ प्रभागांमध्ये विविध शासकीय योजने अंतर्गत करोडे रुपयांच्या निधितून सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्यांची अत्यंत निकृष्ट व बोगसकाम करण्यात आली संबंधित बोगसकामांची चौकशी करण्यात यावी याकरिता शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देखील दिली परंतु या कामांची कुठल्याही प्रकारची चौकशी नकरत नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी संबंधित कामांच्या गुत्तेदारांनी आणलेल्या बोगस गुणनियंत्रण अहवालाच्या आधारे या कामांतील काही कामांची ६०% तर काही कामांची १००% बिल काढून भ्रष्ट कारभाराला हिरवा कंदिल दाखवण्याचे काम केल्याचे उघड झाल्यामुळे या सर्व गैरकारभाराची तात्काळ चौकशी करीत भ्रष्ट गुत्तेदारांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष चंद्रमुनी लोखंडी यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.०४ जुलै २०२३ रोजी आमरण उपोषणाला सुरूवात केली त्यांच्या उपोषणाला आज गुरुवार दि.०६ जुलै २०२३ रोजी तिसरा दिवस उजाडला असतांना देखील प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांनी गेंड्याच्या कातडीचा बुरखा पांगरला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.....
0 टिप्पण्या