🌟महाराष्ट्र राज्यात एका वर्षात दुसरा राजकीय भूकंप : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही सुरुंग...!


🌟अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांसह ०३ खासदारही  शिवसेना-भाजपच्या सरकारात सामील🌟


🌟राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य आठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ🌟

🌟राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी घेतली शपथ🌟


मुंबई (दि.०२ जुलै २०२३) : महाराष्ट्र राज्यात आज रविवार दि.०२ जुलै २०२३ रोजी दुसरा सर्वात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे दिसत असून राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही सुरुंग लावण्यात भाजपा नेत्यांना यश आल्याचे दिसत आहे राज्यातील मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकार मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल ३० आमदार सामील झाल्याने राज्यातील समिकरण बदलल्याचे निदर्शनास येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडल्याचे निदर्शनास येत असूनरा.काँ.नेते अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ,दिलीप वळसे,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम,आदिती तटकरे,संजय बनसोडे,अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या ०९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून अजितदादा पवार हे ३० ते ३५ आमदारांना घेऊन  राष्ट्रवादी काँग्रेसमधुन बाहेर पडल्यामुळे विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे.                                                                          महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुंकप झाला असुन मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार शिवसेना व भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या ०९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

*अजित पवारांसह ०९ जणांनी मंत्री पदाची शिंदे सरकारमध्ये शपथ घेतली :-

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला  आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.

 * राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे :-

अजित पवार यांच्यासोबत ३० ते ४० आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व खासदार अमोल कोल्हे हे देखील अजित पवार सोबत आहेत अजितदादा पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ ते ४० आमदार आहेत.या मध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे यांच्या सह ३५ ते ४० आमदार असल्याचे सांगितले जाते आहे...

  ✍️ *मोहन चौकेकर*


­

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या