🌟जिंतूर तालुक्यातील विविध प्रश्नांवर तात्काळ दखल घेऊन कारवाईची मागणी.....!


🌟रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिले निवेदन🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील मागासवर्गीय भुमीहीन गायराण धारक यांच्या पिकाचा तात्काळ पंचनामा करून ७/१२ उतारा नावे करण्यात यावे,रमाई घरकुल योजना धारक, पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत घरकुल धारक,आदी घरकुल धारक यांना रेती उपलब्ध करून देणे बाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी,श्रावण बाळ, निराधार,अपंग,विधवा महिलांसाठी,ज्या नवीन लाभधारक यांनी प्रस्ताव सादर केला आहेत त्यांचे तात्काळ मीटिंग घेऊन प्रस्ताव निकाली काढण्यात यावे,

सामाजिक वनीकरण विभाग अकोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका अकोली मध्ये मागासवर्गीय भुमीहीन ,जाॅब कार्ड नोंदणी धारक यांना दररोज काम मिळवे, सी एस सी केंद्र व महा ई सेवा केंद्र ज्या ज्या गावांमध्ये दिले आहेत त्या त्या गावातच चालु करण्याची गरज असुन बरेच सी एस सी केंद्र व महाईसेवा केंद्र धारक हे जिंतूर शहरात स्थायिक झाले आहेत म्हणून शाळेतील विद्यार्थी, शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व जिंतूरला यावं लागतं म्हणून यांच्या वर तात्काळ कारवाई करीत नेमुन दिलेल्या ठिकाणीच असावे,

 जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ अनुदान वाटप करण्यात यावे,जिंतुर तालुक्यातील शेतकरी यांना बॅक कडुन पिक कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे व आता पर्यंत किती शेतकरी यांना बॅक कडुन पिक कर्ज योजना अंतर्गत पिक कर्ज वाटप झाले आहे याचा अहवाल मागवने,अवैध गौण खनिज उत्खनन साखरतळा रोड वरील शासकीय भूखंडावरील (माळरान) ,नेमगिरी परिसर वरील शासकीय भूखंडावरील (माळरान),एम आय डी सी कडील शासकीय भूखंडावरील माळरान आदी ठिकाणी होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन वर तात्काळ कारवाई करण्यात यावी,

जिंतुर शहरासह ग्रामीण भागातील अवैध गुटखा,मटका, जुगार,दारु विक्री व अवैध धंद्यावाल्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी,जिंतुर तालुक्यात अवैधरित्या  वाळू साठा जप्त करण्यात आलेला वाळू साठा लिलाव न करता घरकुल धारक यांना देण्यात यावा,जिंतुर शहरातील अवैध धंदे वाले यांना पाठीशी घालणार्या श्रीमती.लिलाताई जोगदंड यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,

बोरी पोलीस स्टेशन च्या ए पी आय श्रीमती गाडेकर मॅडम यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त त्यांच्या बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत बर्याच गावात मिरवनुक मध्ये दगड फेक, महापुरुषांचा अवमान जयंती मिरवनुक अडवने इतर समाजाच्या विघ्न संतोषी लोक जयंती मिरवनुक मध्ये येऊन बौद्ध महिला यांचे फोटो व्हिडिओ काढणे असे प्रकार घडल्यामुळे बोरी पोलीस स्टेशन च्या ए पी आय श्रीमती गाडेकर मॅडम यांची तात्काळ बदली करण्यात यावी,तहसील कार्यालय आतील भागात व बाहेरील बाजूने अवैध अतिक्रमण धारक यांना उठवावे. जिंतूर तालुक्यातील जिंतूर, बोरी, बामणी, चारठाणा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे चालू आहेत हे माहिती असूनही त्या बिटातील बिट जमादार यांनी कार्यवाही न करता पाठीशी घालत आहेत व पोलीस अधिक्षक साहेब परभणी यांच्या पथकाने परभणी वरुन येऊन कार्यवाही केलेल्या अवैध धंदे वाले यांच्या वर या वरुन स्पष्टच होत आहे की बिटातील बिट जमादार हा दोषी आहे म्हणून वरील पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या ज्या बीटात पोलीस अधिक्षक साहेब यांच्या पथकाने अवैध धंदे वर कार्यवाही केली त्या त्या बिटातील बिट जमादार यांच्या वर पण कार्यवाही करावी,मौजे.मानकेश्वर येथील वनीकरण विभाग अंतर्गत नर्सरीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन वनरक्षक श्रीमती.नरवाडे मॅडम यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की,

,वरील सर्व प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन कारवाई करणे बाबत नसता दि.१४/०८/२०२३ रोजी आपल्या कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने एक दिवसीय आंदोलन धरणे करण्यात येईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्व जिम्मेदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी अशी मागणी शरद सुदाम चव्हाण (रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष परभणी पश्चिम ) यांनी तहसीलदार व इतरांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.व त्यांच्या प्रतिलीपी मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री मा.विभागीय आयुक्त,मा.जिल्हाधिकारी परभणी,मा.पोलीस अधिक्षक  परभणी,मा.पोलीस निरिक्षक साहेब जिंतूर यांना पठविल्यांचे म्हटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या