🌟कर्नाटक राज्यातील धारवाड येथे तिकीटाचे पैसे वाचवन्यासाठी चक्क महिलेचा ड्रेस परिधान करून पुरूषाचा बस प्रवास.....!


🌟कर्नाटक सरकारनं महिलांसाठी शक्ती योजनेचा फायदा घेण्यासाठी वीरभद्रेया मठपतीने घातला चक्क बुरखा🌟 

बंगळुरू : कर्नाटकात एक विचित्र घटना घडली आहे बसच्या तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी एका हिंदू व्यक्तीनं परिधान केला या व्यक्तीचा व्हि.डी.ओ. सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हि.डी.ओ.मध्ये एक व्यक्ती बुरखा परिधान केलेल्या अवस्थेत दिसत आहे.त्याच्या जवळ एक बॅग आहे. वीरभद्रेया मठपती असं त्याचं नाव आहे कर्नाटक सरकारनं शक्ती योजनेच्या अंतर्गत महिलांना बस प्रवास मोफत केला आहे. तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी बुरखा परिधान केला होता सदरील घटना कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील आहे.

 बस थांब्याजवळ एक हिंदू व्यक्ती बुरखा परिधान केलेला दिसला. त्याचं नाव वीरभद्रेया मठपती असल्याचं नंतर समजलं.तिथे असलेल्या काहींना त्याच्यावर संशय आला. त्यांनी त्याच्या जवळ चौकशी केली तेव्हा त्याचं बिंग फुटलं. 'भीक मागण्यासाठी बुरखा परिधान केला आहे'असं मठपतीनं स्वत:च्या बचावार्थ सांगितलं मात्र त्याचं उत्तर ऐकून तिथे असलेल्या कोणाचंच समाधान झालं नाही बुरख्यातील व्यक्तीच्या हालचाली पाहून बस थांब्यावरील काहींना संशय आला.

 त्यामुळे त्यांनी चौकशी केली. त्याचं वर्तन, हालचाली पुरुषासारख्या वाटल्या. बुरख्यातील व्यक्ती पुरुष असल्याचं समजातच लोकांनी पोलिसांना बोलावलं पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला समज देऊन सोडलं पोलिसांना मठपतीची झडती घेतली त्याच्याकडे महिलेच्या आधार कार्डची फोटोकॉपी सापडली. पोलिसांनी मठपतीची चौकशी केली विजयपुरा जिल्ह्यातील गोडागेरी गावचा रहिवासी आहे. तो ट्रेननं बंगळुरुहून सांशीला आला होता त्याला बस थांब्यावर एक बॅग सापडली त्यात बुरखा होता 'बस थांब्यावर भीक मागण्यासाठी बुरखा परिधान केला,'असं मठपतीनं पोलिसांना सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या