🌟परभणी शहरातील हॉटेल ग्रीन लिफ येथे एकात्मता गौरव पुरस्कार-२०२३ सोहळा संपन्न...!


🌟परभणीतील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्काराने सन्मानित🌟

परभणी (दि.१६ जुलै २०२३) - परभणी जिल्ह्यात गेल्या 60 - 65 वर्षांपासून स्मृति.रंगुबाई अंभोरे दुधगावकर यांनी स्थापन केलेल्या समाजातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व जाती - धर्माच्या गोर,गरीब,गरजू विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत शैक्षणिक कार्य करणारी शैक्षणिक संस्था माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी या संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुभाष अंभोरे दुधगावकर यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली संस्थेचे सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना श्री चिंतामणी पारसकृपा शहरी व ग्रामीण विकास संस्था परभणी च्या वतीने आज दिनांक 16 जुलै रोजी परभणी शहरातील हॉटेल ग्रीन लिफ येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. पवन निगम, मा.खा. सुरेश जाधव, अनिल मोरे, रामराव वडकुते यांच्या हस्ते "राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार- 2023" मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

या वेळी पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे सचिव प्रमोद अंभोरे व संस्था पदाधिकारी प्रकाश अंभोरे व आदी. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. पवन निगम हे होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन शंताताई उखडकर यांनी केले, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अजमत खान हे होते तर पुरस्कार निवळ समितीचे अध्यक्ष सुरेश हिरवाळे तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. खा. सुरेश जाधव, सिने अभिनेता अनिल मोरे, रामराव वडकुते आदींची होती. हा पुरस्कार माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांना मिळाल्याबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या