🌟यानिमित्त सकाळी दहा वाजता श्री अंबिका माता मंदिर येथे अंबिका माता पूजन व आरती होइल🌟
गंगाखेड( प्रतिनिधी) संत जनाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र गंगाखेड येथे सकल भावसार सेवा संस्था मराठवाडा व गंगाखेड भावसार समाजाच्या वतीने दिनांक 15 जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी दहा वाजता श्री अंबिका माता मंदिर येथे अंबिका माता पूजन व आरती होइल. संत जनाबाई पुण्यतिथी निमित्त अभिवादन तर त्यानंतर प्रा. डॉ. विठ्ठल खं. जायभाये यांचे 'मातोश्री संत जनाबाई- एक अलौकिक ऊर्जा स्तोत्र"या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास राज्यभरातील भावसार बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहावे व संत जनाबाई यांना विनम्र अभिवादन करावे असे आवाहन सकल भावसार सेवा संस्था मराठवाडा व गंगाखेड भावसार समाज यांच्या वतीने जगदीश चव्हाण व अर्जुन राव बालाजी पुरनाळे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या