🌟महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी नर्सेस तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी बेमुद्दत ठिय्या आंदोलन....!


🌟मुंबई आझाद मैदान येथे दि.18 जुलै पासून बेमुदत ठिय्या आदोलनाला होणार सुरुवात🌟

मुंबई (दि.११ जुलै २०२३) - राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील कंत्राटी नर्सेस शहरी /ग्रामीण भागातील सर्व एएनएम,जिएनएम,एलएच,आरबीएसके,एएनएम,एनयुएचएम यांना रिक्त जागेवर समायोजन करून घेण्याबाबत व इतर प्रश्न बाबत 18 जुलै 2023 पासून मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाची पूर्वसूचना.

मागील पंधरा ते सतरा वर्षांपासून अतिशय तुटपुंज मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कर्मचारी आपल्या जीवाची राख रांगोळी करत आरोग्य सेवा देत आहे. नुकत्याच कोरोना महामारी मध्ये आपल्या कुटुंबाची परवा न करता देवदुता सारखी कोविड महामारी वर मात करण्यासाठी रात्रंदिवस आरोग्य सेवा दिलेली आहे व देत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन यांचे वारंवार आंदोलन करून व माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या कक्षात 20/03/2023 रोजी बैठक ही झाली असता, त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कंत्राटी नर्सेस यांना समायोजना करण्याकरिता लवकरच कार्यवाही करण्यात येईल, तसेच या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ बाबत निर्णय घेण्यात येईल ,असे आश्वासन देण्यात आले. या बैठकीत संघटनेने ओडिसा, पंजाब ,राजस्थान, मनिपुर, अशा अनेक राज्यांची विविध भागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजनाबाबत शासन निर्णय देण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी शासनाला निवेदन सादर करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे समायोजन करण्याची विनंती केली होती. तसेच विधानसभेच्या बजेट सत्रात सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शासनाने उत्तर देताना 31 मार्च 2023 पर्यंत समायोजन करण्यात येईल असे सांगितले होते, परंतु 3 महिने होऊन सुद्धा समायोजन ची कार्यवाही तसेच प्रलंबित प्रश्नांबद्दल कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी नर्सेस तीव्र असंतोष पसरलेला आहे. शासनाने समायोजन बाबत तात्काळ सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास विभाग ,वित्त व नियोजन विभाग यासंबंधीत विभागातील मंत्री व अधिकारी यांच्या उपस्थित बैठक घेण्यात यावी ,अन्यथा नाईलाजास्तव कंत्राटी नर्सेस संघटना *कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घेण्याबाबत व इतर प्रश्नांबाबत दिनांक 18 जुलै 2023 पासून मुंबई आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल करिता पूर्व सूचना देत आहेत. वरील संघटनेच्या मागण्या ह्या (1).नियमित आरोग्य सेविका व अधिकारी का यांच्या रिक्त पदावर दहा ते पंधरा वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व कंत्राटी नर्सेस यांना वयाची अट शीतील करून शासन सेवेत समायोजन करण्यात यावे, नंतरच जाहिरात देऊन जागा भरण्यात याव्यात.(2.) जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत ,समान वेतन लागू करण्यात यावी. (3) औरंगाबाद उच्च न्यायालया ने दिलेल्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घेण्यात यावे.(4) वाढत्या महागाईनुसार कंत्राटी नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करण्यात यावे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या