🌟घटनेत वापरलेली ईक्को गाडी सिसीटीव्हीत कैद : वजीराबाद पोलिस स्थानकाच्या हद्दीतील घटना🌟
नांदेड (दि.१६ जुलै २०२३) - नांदेड येथील वजीराबाद पोलिस स्थानकाच्या हद्दीतील बाफना रोड वरील मनोज अग्रवाल यांच्या मालकीचे दुकान असून या दुकानाला बाजूच्या बोळीतील साईडला असलेली ग्रिल सोबत आणलेल्या टेबलाचा वापर करीत कटरने कट करुन दुकानातील अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांचा सिगरेट साठा अज्ञात भामट्यांनी सोबत आणलेल्या चारचाकी ईक्को गाडीत टाकून पळवण्याची घटना आज रविवार दि.१६ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री ०१-०० वाजेच्या सुमारास घडली.
यावेळी अज्ञात भामट्यांनी अंदाजित ४० ते ४५ लाखाच्या मालासह सोबत डिव्हीआर,गल्ल्यातील नगदी जवळपास ४ लाख घेऊन फरार झाले यावेळी घटनेच्या तपासकामी,स्वान पथक सह वजीराबाद पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी ज्या ईक्को गाडीत चोरड्यांनी मुद्देमाल लंपास केला ती गाडी सिसीटीव्हीत कैद झाली आहे घटनेचा तपास सुरू आहे....
_
0 टिप्पण्या