🌟बुध्दीबळ स्पर्धेचे रविवार १६ जुलै रोजी पाथरी रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयात आयोजन🌟
परभणी (दि.१३ जुलै २०२३) : परभणी जिल्हा बुध्दीबळ संघटनेद्वारे कै.सौ. वत्सलाबाई राके स्मृती बुध्दीबळ स्पर्धा रविवार १६ जुलै रोजी पाथरी रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धा स्वीस लीग पध्दतीने खेळविण्यात येणार असून खूला, अंडर 7, अंडर 9, अंडर 11, अंडर 13 व अंडर 15 अशा गटात खेळविल्या जाणार आहेत. खूल्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास स्मृतीचिन्हासह रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. इतर सर्व गटात प्रथम क्रमांकास स्मृतीचिन्ह व रोख रक्कम मिळून एकूण 28 पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिकांची एकूण रक्कम 20 हजार एवढी असणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी डी.व्ही. राके (9420079027), सी.एम. पोटेकर (9860549621), अनिल सेलगावर (9420193717) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. या स्पर्धा पाथरी रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयात रविवार 16 जूलै रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत होणार आहेत. स्पर्धकांनी स्पर्धा शुल्कासह नोंदणी करावी, असे संयोजन समितीने म्हटले आहे....
0 टिप्पण्या