🌟जिंतूर तालुक्यातील इटोली येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी...!


🌟याप्रसंगी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले🌟

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.०१ जुलै २०२३) - जिंतूर तालुक्यातील इटोली येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची ११० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सहशिक्षक भास्कर चव्हाण यांनी वसंतराव नाईक साहेबांचे बहुआयामी कार्य विद्यार्थ्यांना मार्मिक शब्दांत पटवून देत कृषीदिनाचे महत्व सांगत वृक्षावल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे एक मुल एक झाड लावण्यासाठी प्रेरित केले.या कार्यक्रमाला शाळेतील कौशल्या नागरगोजे, गणेश येलाले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तसेच सर्व शिक्षकवृंद व अंगणवाडी सेविका आदि आवर्जून उपस्थित होते.सहशिक्षक परमेश्वर मेनकुदळे यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांने आभार मानले...,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या