🌟पदधिकारी बैठकीत निर्धार : रस्ते,पाणी,विज,सभागृहास प्राधान्य🌟
गंगाखेड (दि.२२ जुलै २०२३) :- गेल्या साडेतीन वर्षात गंगाखेड विधानसभेत कोट्यावधींची विकासकामे झाली आहेत. केंद्र व राज्य शासनाने भरभरून दिले आहे. सत्ता आल्यावर तर विकासाला बळ मिळाले आहे. त्यामुळे ४० वर्षांपासून प्रलंबित असलेले महत्त्वकांक्षी प्रश्न सुध्दा मार्गी लागले आहेत. ती कामे आणि आकडेवारी पाहून जनता समाधानी आहे. मात्र तरीही विकासकामांचा जोर कायम ठेवून उर्वरित कामे पूर्ण करायची आहेत, असा निर्धार गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील मौजे.बनपिपळा येथील निवासस्थानी आ.डॉ.गुट्टे यांनी प्रमुख पदधिकाऱ्यांची विचार-विनीमय बैठक बोलावली होती. त्यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते परवा परभणी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान पात्र यादीत समावेश करावा, अशी लक्षवेधी मांडून विधानसभेत आग्रही मागणी आ.डॉ.गुट्टे यांनी केली होती. त्यामुळे विविध गावातील सरपंच आणि शेतकरी यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले. तसेच बैठकीच्या सुरूवातीला अधिवेशनातील कामगिरीबद्दल पदधिकाऱ्यांनी अभिनंदन ठराव घेतला. पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे आगामी काळात आम्ही आपल्या वाढदिवसाचे नियोजन करीत असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांना आवर्जून सांगितले.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, गावांची संख्या जास्त असल्याने मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी गाव रस्त्याची काही कामे शिल्लक आहेत. तसेच चालू वर्षाच्या निधीतून आवश्यक तेथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत सेवालाल महाराज आणि अहिल्याबाई होळकर सभागृहाचे बांधकाम करायचे आहे. तर वीजेच्या समस्यावरही तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे गावनिहाय माहिती घ्या. लोकांना भेटा. त्यांचे प्रश्न व अडचणी समजून घ्या. कारण, विकासकामे हाच आपला अजेंडा आहे लोकांनी टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नका बैठकीचे औचित्य साधून विविध पदधिकाऱ्यांनी काही प्रशासकीय मान्यता, प्रलंबित प्रश्न व काही थकीत बीलांचे विषय सुध्दा आ.डॉ.गुट्टे यांच्या निर्देशनास आणून दिले. तसेच काही महत्त्वपूर्ण व जिव्हाळ्याच्या विषयांवर अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची विनंती केली.
यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दादा रोकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव पोले, संचालक संभुदेव मुंडे, भाजपचे विधानसभा अध्यक्ष बालाजी रूद्रवार, जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, गंगाखेड तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, पालम तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, पूर्णा तालुकाध्यक्ष गणेश कदम, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, राजू खान, प्रताप मुंडे, उध्दव शिंदे, खालेद शेख, वैजनाथ टोले, सतिश घोबाळे, संजय पारवे, युवक तालुकाध्यक्ष मारोती मोहिते, सर्कल प्रमुख शिवाजी अवरगंड, सुमित कामत, सरपंच गोविंद सानप, मारोती मोहिते यांच्यासह विविध पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या