🌟पुर्णा तालुक्यातील कुंभारवाडी-कंठेश्वर-सातेगाव मुख्य रस्त्याची झाली पांदनवाट : रस्ता दुरुस्तीला उजाडेल काहो पहाट ?


🌟मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या फलकांचा मात्र नुसताच थाट ?🌟

पुर्णा (दि.२१ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागाला तालुक्यासह अन् तालुक्यांच्या राज्यमार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर कालावधी संपल्यानंतर देखील अकार्यक्षम अधिकारी आणि बेजवाबदार भ्रष्ट गुत्तेदारांमुळे रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्णच असल्यामुळे या रस्त्यांची अवस्था अक्षरशः चिखलमय पांदण रस्त्यांप्रमाणे झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक गावकरी आपला जिव धोक्यात घालून या मार्गांवरून मार्गक्रमण करीत असल्याचे निदर्शनास येत असून या खड्डेयुक्त चिखलमय रस्त्यांवर दुचाकी/चारचाकी वाहन फसत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.


 पुर्णा तालुक्यातील धोत्रा,कानडखेड,कान्हेगावसह कुंभारवाडी-कंठेश्वर-सातेगाव या मुख्य रस्त्यांचे अक्षरशः चिखलमय पांदनवाटेत रुपांतर झाल्याने या रस्तांच्या दुरुस्तीला केव्हा पाहाट उजाडेल ? असा प्रश्न उपस्थित होत असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत या रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊन शासकीय नियमानुसार कालावधी समाप्त झाल्यानंतर देखील या मार्गांवरून जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांना केवळ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांच्या अंजापत्रक फलकांचाच थाट पहावयास मिळत आहे त्यामुळे त्रस्त झालेले ग्रामस्थ अक्षरशः त्या फलकांना बघून प्रशासनासह गुत्तेदाराच्या निष्क्रिय कारभारावर थुंकतांना पाहावयास मिळत आहेत.


[मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाला १८ आगस्ट २०२१ रोजी सुरुवात करतांना वाजत गाजत लावलेला अंदाजपत्र फलक]

पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी-कंठेश्वर या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी महाराष्ट्र सरकार ग्रामीण विकास मंत्रालया तर्फे अर्थसहाय्यीत प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण सडक योजनेतून तब्बल १ कोटी २६ लाख ५६ हजार रुपयांचा शासकीय विकासनिधी मंजूर झाला या कामाची सुरुवात मोठ्या थाटामाटात १८ आगस्ट २०२१ रोजी करण्यात आली काम पुर्ण करण्याचा कालावधी १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंतच होता परंतु या कामाचे गुत्तेदार व्हि.टी.पाटील यांनी कामाची कालावधी संपून चार महिने झाले असतांना देखील काम पुर्ण न करता पुर्वीच्याच रोडाचे उत्खनन केल्यामुळे या रस्त्यांचे रुपांतर अक्षरशः चिखल खड्डेमय पांदनवाटेत झाल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा मार्ग ठरण्याची चिन्ह दिसू लागली आहे अशीच एकंदर अवस्था महाराष्ट्र ग्रामीण सडक योजनेतून तब्बल ४८ लाख ९७ हजार रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून होणाऱ्या कानडखेड या रस्त्याची देखील झाली असून या कामाचे कंत्राटदार देखील व्हि.टी.पाटील हेच आहेत एकंदर पुर्णा तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण सडक योजने अंतर्गत सहा कामे मंजूर झाली असून या सर्व कामांचे कंत्राटदार व्हि.टी.पाटील हेच असून ही सर्व कामे अद्यापही जश्याच तशीच आहे.....     


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या