😭उषःकाल होता होता,पुन्हा झाली काळरात्र....!


🌟मनात पेटताना शोकाग्नी,उरलायं सांत्वनाचाच वारा !!

😪 *राजेंद्र काळे*

उषःकाल होता होता,

पुन्हा झाली काळरात्र..

मध्यरात्रीच्या काळोखात,

मृत्यूही झाला गलितगात्र !

धूम-स्पीड-रेसच्या नादात,

वाढत चाललाय फक्त वेग..

वेगानेच गाठतोय मग काळ,

शेवटी उरतोय केवळ उद्वेग!

विकास म्हणजे खरं काय ?

अशीच असते का समृद्धी..

महामार्गावर मरणाचा सडा,

अपघातात सातत्याने वृद्धी !

'समृद्धी'साठी द्यायचे,

पूर्वी काळरात्री नरबळी..

या 'समृद्धी'वर झाली,

२५ जीवांची राखरांगोळी !

बर्निंग ट्रॅव्हलचा थरार,

कसे असेल अकांडतांडव ?

पेटलेले लाक्षागृह पाहून,

जणू भयभीत झालेले पांडव !

आता फक्त श्रद्धांजली,

डोळ्यात आसवांच्या धारा..

मनात पेटताना शोकाग्नी,

उरलायं सांत्वनाचाच वारा !!

😪 *राजेंद्र काळे*

       बुलडाणा ९८२२५९३९२३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या