🌟या स्पर्धेमध्ये कु.अंजली पैठणे हिने प्रथम क्रमांक मिळविला तर कृष्णा करदोडे याने द्वितीय क्रमांक मिळविला🌟
पुर्णा (दि.०१ जुलै २०२३) - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात " शासनाच्या विविध योजना आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मिळणारे विविध शासकीय लाभ " या विषयावर वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. केंद्र व राज्य शासनाकडून जनतेसाठी राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनेबाबत जाणीव जागृती करण्यासाठी आणि या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाविद्यालयीन स्तरावर या योजनेविषयी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा आशा विवीध स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे शासनाकडून निर्देश देण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये कु.अंजली पैठणे हिने प्रथम क्रमांक मिळविला तर कृष्णा करदोडे याने द्वितीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी केले. या कार्यक्रमाची भूमिका सांस्कृतिक प्रभारी प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मांडली. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी केले तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दत्ता पवार यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या