🌟कर्तव्यतत्पर पो.नि.प्रदिप काकडे यांनी अधिकारी/कर्मचाऱ्यांना मागील गुन्ह्यांचा तपास तात्काळ पुर्ण करण्याचे दिले आदेश🌟
परभणी/पुर्णा (दि.०७ जुलै २०२३) - परभणी जिल्ह्यात संवेदनशिल तालुका म्हणून ओळख असलेल्या पुर्णा पोलिस स्थानकाचे नवनियुक्त पोलिस निरिक्षक श्री.प्रदिप काकडे यांनी आज शुक्रवार दि.०७ जुलै २०२३ रोजी आपल्या पदाचा पदभार स्विकारला तत्पुर्वी पालम पोलिस स्थानकात पोलिस निरिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतांना पो.नि.श्री.काकडे यांनी अनेक गुन्ह्यांचा अत्यंत यशस्वीपणे तपास लावून पालम तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता.
पुर्णा पोलिस स्थानकाच्या पोलिस निरिक्षक पदाचा पदभार पो.नि.प्रदिप काकडे यांनी स्विकारल्यानंतर पुर्णा पोलिस स्थानकात कार्यरत पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील विविध राजकीय पक्ष/सामाजिक संघटना पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वागत करुन त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी पो.नि.काकडे यांनी पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांना कार्यतत्परतेसह शिस्तबध्द कर्तव्याचे धडे दिले व मागील गुन्ह्यांचा तपास तात्काळ करण्याचे आदेशही दिल्याने आज त्यांच्या कर्तव्यतत्परतेसह कर्तव्यदक्षतेचा सर्वांनाच परिचय झाला.....
0 टिप्पण्या