🌟बालासाहेब जगतकर यांच्याकडून प्रकाश कांबळे यांच्या मुलीच्या लग्नास पाच हजार रुपयांची आर्थिक मदत🌟
परळी (दि.१० जुलै २०२३) - परळी शहरातील भीम नगर येथील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने भीम नगर येथील प्रकाश विठ्ठलराव कांबळे यांच्या मुलीच्या लग्नात पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येत असून आजच्या परिस्थितीत मुलींच्या लग्नासाठी वधू पित्यास खूप अडचणींना तोंड देऊन मुलीचा विवाह करावा लागतो त्यासाठी एक सामाजिक ऋण म्हणून परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने भीम नगर येथील प्रकाश विठ्ठलराव कांबळे यांच्या मुलीचा विवाह काल दिनांक नऊ सात 2023 रोजी परळी शहरातील वैद्यनाथ प्रतिष्ठान येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला असून या लग्नास एक खारीचा वाटा म्हणून व मुलीच्या पित्याची अडचण लक्षात घेता पाच हजाराची मदत करण्यात आली. तसेच इथून पुढेही भीम नगर साठे नगर प्रबुद्ध नगर रमानगर इत्यादी विभागातील प्रत्येक मुलीच्या लग्नास तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने पाच हजाराची मदत करण्यात येणार असल्याची माहितीही तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर ज्येष्ठ नेते सोपानराव ताटे एडवोकेट संजय रोडे बळीराम रोडे संतोष आदोडे अशोक जगतकर इत्यादीच्या हस्ते मुलीच्या वडिलास देण्यात आले असून या उपक्रमाबद्दल लग्नातील वऱ्हाडी मंडळी व पाहुणे मंडळी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा ही दिल्या असेही प्रसिद्धी पत्रकार द्वारे माहिती देण्यात आली आहे...
0 टिप्पण्या