🌟मुंबईतील अल्पसंख्याक मेळाव्यास मा.नगराध्यक्ष हाजी कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पुर्णेतील असंख्य कार्यकर्ते जाणार....!


🌟पुर्णा तालुक्यात शिवसेनेचे खंबीर नेतृत्व भाई एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणार - हाजी साहाब कुरेशी


परभणी/पुर्णा (दि.०७ जुलै २०२३) - महाराष्ट्र राज्याची राजधानी  मुंबई येथे दि.०९ जुलै २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लढवैये स्वाभिमानी नेतृत्व भाई एकनाथ शिंदे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी अल्पसंख्याकां मेळावा आयोजीत केला आहे या मेळाव्यास मराठवाड्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील भुमिपुत्र युवा नेते सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गंगाखेड विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक समाजातील उभरते नेतृत्व तथा पुर्णा तालुक्यातील भुमिपुत्र माजी नगराध्यक्ष हाजी साहब कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पुर्णा तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजासह सर्वधर्मिय असंख्य कार्यक्रते या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी मुंबईला जाणार आहेत.

राज्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून शिवसेनेच्या वाटचालीत अठरा पगड जातीना स्थान मिळावे यादृष्टीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन धर्मवीर स्वर्गिय आनंदजी दिघे साहेब यांच्या विचारांनी एकनिष्ठ राहून मुख्यमंत्री मा.ना.भाई एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी व अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचा राज्यस्तरीय अल्पसंख्यांक मुस्लीम भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तमाम मुस्लीम बांधव या भव्य मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे हा अल्पसंख्यांक मेळावा मुबई येथील षण्मुखानंद सभागृह येथे रविवार दि.०९ जुलै २०२३ रोजी होणार आहे.

त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघातील उभरते अल्पसंख्यांक झुंजार नेतृत्व तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी यांनी पूर्णा तालुक्यातून जास्तीतजास्त लोकांना मुबई येथे नेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी याच्या नेतृत्वाखाली असख्य कार्यक्रते या मेळाव्यास जाणार असल्याचे चित्र दिसत आहे त्याच बरोबर या मेळाव्या मध्ये राष्ट्रवादी पक्षासह काँग्रेस,शिवसेना पक्षाचे आजी माजी नगरसेवक तथा पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश ही करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी यांनी दिली आहे....

*********************************************

🌟पुर्णा तालुक्यात शिवसेना पक्षाचे नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणार :-


🌟माजी नगराध्यक्ष हाजी साहब कुरेशी यांचा दृढ निर्धार🌟

गंगाखेड विधानसभा मतदार संघातील उभरते अल्पसंख्यांक झुंजार नेतृत्व तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हाजी साहब कुरेशी यांनी अजितन्युज हेडलाईन्स या वेबवृत्त वाहिनीशी बोलतांना असे नमूद केले की मराठवाड्यातील अल्पसंख्यांक समाजातील उभरते नेतृत्व तथा पाथरी येथील भुमिपुत्र शिवसेना नेते सईद खान यांच्या खंबीर नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यासह गंगाखेड मतदार संघातील पुर्णा पालम गंगाखेड या तिनही तालुक्यात शिवसेना (बाळासाहेबांची) या पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने अल्पसंख्याक समाज त्यांच्या पाठीशी असून राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीकोनातून दि.०९ जुलै रोजी मुंबईत आयोजित अल्पसंख्यांक मेळाव्याची जय्यत तय्यारी सुरु असून पुर्णा तालुक्यासह पालम गंगाखेड तालुक्यातून देखील असंख्य कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे हाजी कुरेशी यांनी म्हटले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या