🌟‘शासन आपल्या दारी’ अभियान : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या....!


🌟असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले🌟

परभणी (दि.१९ जुलै २०२३) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गंत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. या महामंडळाकडून अनुसूचीत जातीतील चर्मकार समाजातील पात्र व गरजूंना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुदती कर्ज योजना, लघुऋण वित्त योजना, महिला समृद्धी योजना, महिला किसान योजना व शैक्षणिक कर्ज योजनेचा एन.एस.एफ.डी.सी. यांच्या योजनांचा समावेश होतो. या योजनांमध्ये मुदती कर्ज योजना पाच लाखापर्यंत, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना एक लाख ४० हजार, महिला अधिकारिता योजना पाच लाखापर्यंत अशा प्रत्येकी १०० ते ५०० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी कळविले आहे.  

महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थि‍क वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच एन.एस.एफ.डी.सी. यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेत आता वाढ करण्यात आली असून, भारतामध्ये २० लाख व विदेशात शिक्षण घेण्यासाठी ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या महामंडळाच्या कार्यालयास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या