🌟पुर्णा तालुक्यातील आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गौर गावाचे झाले चिखलवाडीत रुपांतर ?


🌟गौर ग्रामस्त त्रस्त ग्राम पंचायत प्रशासन मदमस्त अन् अकार्यक्षम सरपंच ग्रामसेवक आपआपल्या कारभारात व्यस्त🌟 


पुर्णा (दि.२० जुलै २०२३) - पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील अगदी पहिलेच असलेले गाव जे पुर्णेहून केवळ सहा किलोमीटर अंतरावर असलेले गौर गाव या गावाची लोकसंख्या अंदाजे सहा ते साडेसहा हजार एवढी असून या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जागृत हेमाडपंथी सोमेश्वर महादेव मंदिर व मंदिरा समोरील पुरातन बारव या सोमेश्वर देवस्थानासह बारवाची नुकतीच जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन परभणी जिल्हा प्राचिन ऐतिहासिक वारसा या 'वारसा शिल्पसंपदेचा' या पुस्तकात नोंद केली आहे.


पुर्णा तालुक्यातील अत्यंत धार्मिक परंपरा जोपासण्यासह पवित्र जागृत देवस्थान असलेले हे गाव मात्र भ्रष्ट अन् बेईमानशाहीने सर्वात अविकसित गाव म्हणून नावारुपाला आणले असे म्हणने चुकीचे ठरणार नाही कारण कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर देखील गावातील सद्याची परिस्थिती बघितल्यास असे निदर्शनास येते गावातील रस्ते नाल्या पावसाळ्याच्या पहिल्याच ठप्प्यात अदृष्य झाल्यात की काय ? असा प्रश्न निर्माण होणार नाही तर नवलच भ्रष्ट लोकप्रतिनिधी बेईमान गुत्तेदार अन् त्यांच्या टाकलेल्या टक्केवारीच्या तुकड्यावर मागचा पुढचा विचार नकरता सरळ 'आदर्श ग्राम पुरस्कार' पुरस्कार देणारे अधिकारी धृतराष्ट्राच्या भुमीकेत होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होतो गौर गावातील सार्वजनिक रस्ते बंदिस्त नाल्या आणि पिण्याच्या पाण्याची दुरावस्था गौर गावातील भ्रष्ट बेईमानशाही कारभाराची साक्ष देत असल्याचे दिसत आहे.


गौर गावातील बसस्थानक ते गावाला जोडणारे रस्ते अक्षरशः चिखलमय झाल्यामुळे श्री.सोमेश्वर महादेव देवस्थानात दर्शनाला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक भक्तांसह गावातील अबाल वृध्द शाळेत जाणारे येणारे विद्यार्थी-विद्यार्थींनींना अक्षरशः चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागत असल्यामुळे अकार्यक्षम गौर ग्रामपंचायत प्रशासनाने मुरुमा ऐवजी गावातील पाडलेल्या जुन्या घरांचे मटेरियल या रस्त्यांवर टाकण्याचा अतिशहाणपणा केल्यामुळे या रस्त्यांवर जास्तच चिखल झाल्याचे निदर्शनास येत आहे.....         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या