🌟पुर्णेतील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन....!


🌟गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि.०३ जुलै रोजी सकाळी ०९-०० ते दुपारी ०३-०० वाजेपर्यंत होणार आरोग्य तपासणी🌟

पुर्णा (दि.०१ जुलै २०२३) - प.पु.गुरुमाऊलींच्या २०% अध्यात्म व ८०% समाजकार्य या उक्ती नुसार 'श्री गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने' सोमवार दि.०३ जुलै २०२३ रोजी सकाळी ०९-०० ते दुपारी ०३-०० पर्यंत पुर्णा शहरातील अमृतनगर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या मोफत आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या विविध आजारांवर मोफत तपासणी व औषधोपचार होणार आहेत. या आरोग्य शिबिरा साठी परभणी येथील नामांकित डॉक्टर दत्तात्रय किरडे व डॉक्टर मोनिका पवार मॅडम हे उपस्थित राहणार आहेत.

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राकडून आयोजित शिबिरामध्ये मणक्यांचे आजार,हाडांचे दुखणे,मान पाठ दुखणे,डोके दुखणे,महिलांचे विविध आजार,चक्कर येणे,मेंदू संबंधित आजार आदी आजारांच्या तपासण्या व उपचार करण्यात येणार असून श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राकडून अशा विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जाणार असून या आरोग्य शिबिरा साठी परभणी येथील नामांकित डॉक्टर दत्तात्रय किरडे व डॉक्टर मोनिका पवार मॅडम हे उपस्थित राहणार आहेत..

या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा सर्व सेवेकऱ्यांनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या