🌟बिड जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांनी घेतली राज्य अधिकृती समिती सदस्य एस.एम.देशमुख यांची भेट..!


🌟एस.एम.देशमुख यांच्या निवासस्थानासह माणिक बागेला ही दिली भेट🌟

बिड (दि.१३ जुलै २०२३) - बिड जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांनी आज गुरुवार दि.१३ जुलै २०२३ रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा राज्य अधिकृती समितीचे सदस्य एस.एम.देशमुख यांची त्यांच्या मुळगावी  देवडी येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांनी श्री देशमुख यांच्या निवासस्थानासह त्यांच्या माणिक बागेला देखील भेट दिली यावेळी श्री.मोकाटे यांनी एस.एम.देशमुख यांची राज्य अधिस्विकृती समितीच्या सदस्य पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देखील दिल्या यावेळी देशमुख कुटुंबासह गावकऱ्यांच्या वतीने उपमुख्याधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांचा सत्कार ही करण्यात आला..... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या