🌟परभणी जिल्हा व सत्र न्यायायलाचे सन्माननीय न्यायाधीश यांचे आदेश🌟
परभणी : प्रतिनिधी दिवाणी न्यायालयाचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश असतांनाही जिंतूर तालुक्यातील इटोली येथील व्यापारी चंद्रशेखर अप्पा श्रीकांत अप्पा तडकसे उर्फ तोडकरी याने नुकसान भरपाईस टाळाटाळ केली व न्यायालयात हजर न राहील्याचे कारणाने दिवाणी कारागृहात रवानगी करण्याचे महत्त्वपूर्ण जिल्हा व सत्र न्यायाधीश बोलरेपवार यांनी आदेश दिले.
जिंतूर येथील धरमसिंग पवार यांचा अपघाती मृत्यू झाला होता.या अपघात ग्रस्त वाहनाचे मालक व्यापारी चंद्रशेखर अप्पा श्रीकांत अप्पा तडकसे उर्फ तोडकरी हे होते. दिवाणी न्यायालयाने दि. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी नुकसान भरपाई मंजुर केली. धरमसिंग पवार यांच्या पत्नीने तब्बल ९ वर्ष न्यायलयीन लढाई लढत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणी मयत धरमसिंग पवार यांच्या पत्नीच्यावतीने अॅड़ आर. बी. वांगीकर यांनी युक्तीवाद केला. नुकसान भरपाईची रक्कम न्यायलयाने मंजुर करूनही सदरील व्यापारी हा प्रतीष्ठेच्या आणि श्रीमंतीच्या जोरावर भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत न्यायलयाचा समन्स असूनही सदरील व्यक्ती हजर राहत नाही. त्यामुळे यास दिवाणी जेलमध्ये पाठविण्यात यावे असा युक्तीवाद केला.हा युक्तीवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश बोरलेपवार यांनी चंद्रशेखर अप्पा श्रीकांत अप्पा तडकसे उर्फ तोडकरी यास कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अॅड. आर. बी. वांगीकर यांना अॅड़ सोमनाथ व्यवहारे, अॅड़ शंकर संगेकर यांनी सहकार्य केले. या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे....
0 टिप्पण्या