🌟परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठास आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ जाहीर....!


🌟संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनात प्रदान केला जाणार पुरस्कार असे ग्रीन मेंटर्सचे डॉ.विरेंद्र रावत यांनी कळविले🌟

परभणी (दि.१३ जुलै २०२३) - परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्‍थेचा प्रतिष्ठित आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ जाहीर झाला आहे. हा पुरस्‍कार दिनांक १५ सप्‍टेंबर  रोजी न्‍युयॉर्क ये‍थे आयोजित ७ व्‍या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्‍फरन्‍समध्‍ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रसंगी प्रदान केला जाणार आहे, असे ग्रीन मेंटर्सचे डॉ.विरेंद्र रावत यांनी कळविले आहे. 

ग्रीन मेंटर्स ही संस्‍था युनेस्कोच्या ग्रीनिंग एज्युकेशन पार्टनरशिपचे भागीदार असुन पर्यावरण रक्षण जागरूकतेकरिता जागतिक पातळीवर कार्य करते. मागील काही वर्षापासून विद्यापीठांर्गत संपुर्ण मराठवाडयातील महाविद्यालये, विद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र इत्‍यादी व्‍दारे राबविण्‍यात येत असलेल्‍या पर्यावरण जागरूक उपक्रम यात वृक्ष लागवड, सौर ऊर्जाचा शेतीत व वीज निर्मिती करून वापर, स्‍वच्‍छ परिसर, सुंदर परिसर, प्‍लॉस्टिक मुक्‍ती करिता प्रयत्‍न, शेतकरी बांधवामध्‍ये सेंद्रीय शेती, जैविक खते, जैविक निविष्‍ठाचा प्रसार व प्रचार आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये शैक्षणिक अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमातून शाश्‍वत पर्यावरणाबाबत जागरूकता आदी कार्यातील योगदानाच्‍या आधारे विद्यापीठाची आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ करिता निवड करण्‍यात आली आहे. 

पुरस्‍काराबाबत कुलगुरू डॉ.इन्‍द्र मणि म्हणाले की, विद्यापीठातील अधिकारी,  प्राध्‍यापक, शास्त्रज्ञ, कर्मचारी, व विद्यार्थ्यी यांनी  हरित विद्यापीठाकरिता उपक्रमात केलेल्या कार्याचा गौरव आहे. पर्यावरण रक्षण हे प्रत्‍येकांचे आद्य कर्तव्‍य असून हरित वसुंधरा उपक्रमात प्रत्येकाने योगदान देण्‍याची गरज आहे. विद्यापीठ परिसरात २५ एकर प्रक्षेत्रावर घनवन व फळबाग लागवडीचे कार्य हाती घेतले असून जीआयझेड प्रकल्‍पात अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सौर उर्जेतून वीज निर्मितीसोबत पिक लागवडीचे संशोधन हाती घेतले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या