🌟तांदुळवाडी येथे बुधवार दि.२६ जुलै रोजी होणार अंत्यसंस्कार🌟
परभणी (दि.२५ जुलै २०२३) : गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी येथील लक्ष्मण रामराव तांदळे वय ३४ वर्षे या भारतीय लष्करातील जवानाचा राजस्थानात अलोर या भागात कर्तव्य बजावित असतांना सोमवारी रात्री एका अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
तांदळे हे भारतीय लष्करात तांत्रिक विभागात कार्यरत होते. ते राजस्थानातील अलोर भागात कर्तव्यावर असतांना सोमवारी रात्री ११-३० वाजेच्या सुमारास एका अपघातात जखमी झाले. लष्करी अधिकार्यांनी तातडीने तांदळे यांना जयपूर येथील सैनिकी इस्पितळात दाखल केले, परंतु मंगळवारी दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास उपचार सुरु असतांना तांदळे यांचा मृत्यू झाला.
लष्करी अधिकार्यांनी मंगळवारी दुपारी प्रशासनासह कुटूंबियांना या संदर्भातील माहिती कळविली तेव्हा तांदुळवाडीतसह परिसरात शोककळा पसरली. दरम्यान, तांदळे यांचे पार्थीव बुधवार दि.२६ जूलै २०२३ रोजी सकाळी तांदुळवाडीत आणण्यात येणार असून दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात तांदळे यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली....
0 टिप्पण्या