🌟जिंतूर येथील अल्पसंख्याक मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन....!

 


🌟महाराष्ट्र शासनाने अलपसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता वसतिगृह सुरु केले आहे🌟

परभणी (दि.04 जुलै 2023) : जिंतूर येथील अल्पसंख्याक मुलींच्या शासकीय वसतीगृहात अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनी प्रवेशासाठी अधिक्षिका अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतीगृह जिंतूर यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन,जिंतूर तथा सदस्य सचिव अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतीगृह जिंतूर यांनी केले आहे.

जिंतूर शहरातील बेलदरी रोड, टिपू सुलतान चौक रस्त्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने अलपसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता वर्ष 2016 पासून वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. सदर वसतिगृहामध्ये 100 मुलींपैकी 70 टक्के अल्पसंख्यांक समुदायातील मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी मुलींसाठी राखीव आहेत. तर उर्वरित 30 टक्के जागा बिगर अल्पसंख्याक मुलींमधून शासनाच्या प्रचलित आरक्षणानुसार भरण्यात येतात. खुल्या प्रवर्गातील मुलींसाठी प्रवेशाकरिता प्रथम सत्र 2850/- रुपये इतके निवासी शूल्क आकारण्यात येते. ज्या अल्पसंख्यांक मुलीच्या उत्पन्न रु. 8 लाख पेक्षा कमी आहे अशा मुलींसाठी निवासी शुल्क पूर्णपणे माफ असणार आहे. वसतीगृहात प्रवेश घेणाऱ्या मुलींना जेवण, नाश्ता इ. खर्च स्वतः भागवावा लागेल. तसेच 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक मुलींना शासनामार्फत दरमहा 3 हजार रुपये मेस भत्ता मिळेल. 

वसतीगृहाची सुसज्ज इमारत, शंभर मुलींची राहण्याची सोय, सोलार, गिझर इ. व्यवस्था आहे. प्रत्येक विद्यार्थिनीसाठी अद्ययावत फर्निचर, कॉट, गादी, उशी, खुर्ची, स्टडी टेबल, कपाट इ. व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टि.व्ही कॅमेराची व्यवस्था, वसतिगृहात 24 तास महिला अधिक्षिका, स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी सफाई कामगार व्यवस्था, सुरक्षिततेच्या दृष्टीने 24 तास महिला वॉचमनची नियुक्ती करण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या