🌟नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अनुकंपा धारकांची सामायिक जेष्ठता यादी प्रसिध्द....!


🌟जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nanded.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे🌟

नांदेड (दि.20 जुलै 2023) :- जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर 22 ऑगस्ट 2005 ते 30 एप्रिल 2023 पर्यतची वर्ग-3 व वर्ग-4 अनुकंपाधारकांची अंतीम सामायिक जेष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nanded.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिध्द करण्यात आलेली यादी सर्व अनुकंपा नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी संकेतस्थळावरुन प्राप्त करुन सर्व संबंधिताच्या निदर्शनास आणून द्यावी.

शासन निर्णयात नमूद तरतुदी, निकषाचे काटेकोर पालन करुन अनुकंपा प्रतिक्षासुची, नियुक्ती बाबतची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. अनुकंपा नियुक्ती बाबतची कार्यवाही नियमानुसार विहित वेळेत करण्याची दक्षता अनुकंपा नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच ज्या कार्यालयाच्या बाबतीत नियुक्ती प्राधिकारी हे विभाग स्तरावर किंवा राज्यस्तरावर आहेत अशा संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्यास्तरावरील संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्दशनास आणून द्यावी असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या