🌟मराठवाडा एक्सप्रेस जात असतांना मानवतरोड-सेलू स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळ तुटल्याची घटना उघड....!


🌟ढेंगळी पिंपळगाव येथील घटना : सुदैवाने कुठलीही हाणी नाही🌟

परभणी (दि.१९ जुलै २०२३) - धर्माबाद-मनमान मराठवाडा एक्सप्रेस मानवतहून सेलूकडे निघाली असतांना ढेंगळी पिंपळगाव जवळ रेल्वे रुळ तुटल्याचे लोको पायलट व गार्डच्या लक्षात आल्यामुळे तात्काळ मराठवाडा एक्सप्रेस थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले सदरील घटना आज बुधवार दि.१९ जुलै २०२३ रोजी सकाळी ०७-०० ते ०८-०० वाजेच्या सुमारास घडली लोको पायलटच्या (चालक) यांच्या सतर्कतेमूळे फार मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेची माहिती समजताच रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणा घटना स्थळाकडे रवाना झाल्याचे समजते रेल्वे रुळाचे स्लिपरसह रुळाचा भाग कशामुळे तुटला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही या घटनेमुळे छत्रपती संभाजी नगर येथून परभणीकडे जाणाऱ्या तसेच परभणीकडून जाणाऱ्या सर्व प्रवासी तसेच मालवाहक रेल्वेच्या फेऱ्या विलंबाने जाणार आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या