🌟असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे🌟
परभणी (दि.13 जुलै 2023) : जिल्ह्यातील सर्व ॲम्बुलन्सधारकांनी आपले वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखावर ॲम्बुलन्स संवर्गात नोंदविलेले आहे. सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे आपण आपल्या ॲम्बुलन्सचे नोंदणी प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, इंश्युरन्स, पी.यु.सी इत्यादी सर्व कागदपत्रे तसेच वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स वैध ठेवूनच रस्त्यावर चालवण्यात यावे. तसेच वाहनाची तांत्रिक स्थिती सुव्यवस्थित ठेवावी. आपले वाहन हे ॲम्बुलन्सकरिता आवश्यक असणारी सर्व अटींची पुर्तता पूर्ण करतात याची खात्री करुन आपल्या सोयीनुसार आपले वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नि:शुल्क तपासणीसाठी घेऊन यावे. (वाहनाचे फिटनेस सुरु असले तरीही) व प्रमाणपत्र घेऊन जावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे....
0 टिप्पण्या