🌟नरखेडा येथील एका पत्रकारास शिविगाळ आणि जिवे मारण्याची धमकी🌟
नरखेडा : पत्रकारांवर हल्ले करण्यासाठी, त्यांना धमक्या, शिव्या देण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही.. अगदी बातमीत नाव छापले नाही, नाव शेवटी छापलं एवढं कारणंही पुरेसं असतं.. नरखेडा येथून आलेली बातमी अशीच आहे.. बातमी संदर्भात प्रतिक्रिया का मागितली म्हणून नरखेडा येथील एका पत्रकारास शिविगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली गेली..
ट्रायअम्प कॉन्व्हेंट, सावरगाव या शाळेस शिक्षण विभागाने परवानगी नाकारली.. त्यामुळे अनेक पालक शाळा सोडण्याचा दाखला घेण्यासाठी जमा झाले होते.. मात्र शाळा व्यवस्थापन समिती दाखले देत नव्हती.. ही बातमी कव्हर करण्यासाठी योगेश गिरडकर, सहदेव वैद्य आणि लक्ष्मीकांत पटेल हे पत्रकार घटनास्थळावर पोहोचले .. पालकांची भूमिका समजून घेतल्यानंतर योगेश गिरडकर यांनी संस्था चालक बंडू तागडे यांना संस्थेची बाजू समजून घेण्यासाठी फोन केला.. त्यावर तागडे यांनी पत्रकार गिरडकर यांना जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली..माझ्या शाळेची बातमी देतोस का, तुला बघून घेतो म्हणत धमकी दिली..
नरखेडा येथील पत्रकारांनी आज पोलीस निरिक्षकांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. नागपूर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला आहे...
0 टिप्पण्या