🌟पालम नगर पंचायतील भ्रष्टाचारा विरोधात उपोषण : आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यतत्परतेमुळे अखेर उपोषण सुटले...!


🌟आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पारदर्शी संवादामुळे उपोषणकर्ते रामप्रसाद मणियार यांनी अखेर उपोषण सोडले.🌟


परभणी/पालम (दि.२३ जुलै २०२३) - परभणी जिल्ह्यातील पालम नगर पंचायत अंतर्गत गेल्या काही वर्षात झालेल्या नगरोत्थान पाणी पुरवठा योजना,घनकचरा व्यवस्थापन,स्वच्छता देखभाल,हायमास्ट सोलार बल्ब,लेंडी नदीवरील पूल यासह इतर विविध कामांची जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सखोल चौकशी होवून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद बालासाहेब मणियार यांनी काही सहकाऱ्यांसह पालम तहसील कार्यालय समोर मागील आठ दिवसापुर्वी दि.१५ जुलै २०२३ पासून आमरण उपोषण सुरू केले होते त्याची नोंद घेत गंगाखेड विधानसभेचे संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आज रविवार दि.२३ जीलै रोजी उपोषकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेत कागदपत्रांची पाहाणी केली. उपोषकर्त्यांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे बोलणे करून दिले आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि पारदर्शी संवादामुळे उपोषणकर्ते रामप्रसाद मणियार यांनी उपोषण सोडले.

यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दादा रोकडे, प्रभारी माधवराव गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब एंगडे, पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पूर्णा माधव बोथीकर, गटविकास अधिकारी उदयसिंग सिसोदे, कृउबाचे सभापती गजानन रोकडे, नगरसेवक मोमिन कुरेशी, तालुका अध्यक्ष बालासाहेब रोकडे, तुकाराम पाटील, गणेशराव घोरपडे,  गटनेते उबेदखा पठाण, गणेश हत्तीअंबीरे, माऊली घोरपडे, गजानन देशमुख, असदउल्ला खा पठाण, विनोद किरडे, विनायक पौळ, माधन शिंदे, भगवान सिरसकर, राहूल शिंदे यांच्यासह नागरिक, शेतकरी,  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या