🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट हेडलाईन्स बातम्या.....!


🌟साहाय्यक प्राध्यापकांसाठी आता पीएचडी आवश्यक नाही ; यूजीसीकडून नियमांमध्ये बदल🌟 

✍️ मोहन चौकेकर                             

* मुंबईत अजितदादा पवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन ; मला आशीर्वाद द्या,जीवात जीव असेपर्यंत कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही -- अजितदादा पवार 

* राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नियुक्ती, सर्वमताने ठराव झाल्याचे पत्र आयोगात,तुम्ही कधी थांबणार आहात की नाही ? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल ,उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थोरल्या पवारांवर निशाणा ते पहाटेच्या शपथविधीवरुन अनेक गौप्यस्फोट, अजित पवारांच्या या कार्यक्रमात/ सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 32 आमदारांची उपस्थिती

* आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळेंवर निशाणा ; लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, बाकी कुणावरही बोला, बापाचा नाद करायचा नाही --सुप्रिया सुळे  

* घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, जे माझा फोटो लावतात त्यांना माहिती आहे, त्यांचं नाणं चालणार नाही ; शरद पवारांची चौफेर टीका  गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, शरद पवार यांचं प्रत्युत्तर 

* आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांची जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या वर टीका ; तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का ? जयंत पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल ; आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही ; खासदार अमोल कोल्हेंचा पलटवार

* शिवसेनेला मिठी मारू शकतो, तर मग भाजप का नाही ? अजितदादांना बदनाम करण्यासाठी काहींचा कट; प्रफुल्ल पटेल यांचा आरोप ; नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत गेली, मग आम्ही काय चूक केली ? : छगन भुजबळ 

* मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट, आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; समुद्रातही उंच लाटा येण्याचा इशारा ; मराठवाड्यात जालना, परभणीसह वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट ; संभाजी नगरच्या संजरपूरवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले.

* साहाय्यक प्राध्यापकांसाठी आता पीएचडी आवश्यक नाही; यूजीसीकडून नियमांमध्ये बदल 

* तर मी पवारांची औलाद असल्याचे सांगणार नाही”, अजित पवार संतापले

* अनेकदा मी कमीपणा सहन केला”, अजित पवारांनी बोलून दाखवली मनातील खंत.

* माझ्या दैवताला, विठ्ठलाला आजही विनंती आहे की…; अजित पवारांची शरद पवारांना आशीर्वाद देण्याची विनंती.

* ती संधी मिळाली असती तर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री आजही तुम्हाला दिसला असता – अजित पवार

* '2024 मध्ये नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, हे शरद पवारांनाही मान्य'; अजित पवारांचा गौप्यस्फोट

* प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत नोंदणी करावी! शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन.

* विशाल साळवी यांची क्विक हील टेक्नोलॉजीजच्या सीईओपदी नियुक्ती.

* साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; तीन दिवसांत सात कोटींचं दान,

* आत्तापर्यंत राज्यात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, दुष्काळ निवारणासह खरीपा संदर्भास बैठक

* प्रतीक्षा संपली : कंगना रनौतच्या 'तेजस'ची रिलीज डेट समोर ; वैमानिकेच्या भूमिकेत झळकणार 'पंगाक्वीन'; 20 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित 

* नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये टॅामेटोची आवक घटली, किलोला मिळतोय 100 ते 120 रुपयांचा दर.

* जो बायडेन यांना मोठा झटका व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांवर कोर्टाने लागू केले निर्बध.

* महाविद्यालयीन प्रवेश रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना शुल्क परत करा, UGC चे निर्देश.

* यूजीसीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; सहायक प्राध्यापक नियुक्तीसाठी पीएच.डी.ची अट संपुष्टात.

* शाहरुख खानने रचला नवा विक्रम! 'जवान' अन् 'डंकी'ने रिलीजआधी केली 500 कोटींची कमाई

* मुंबईत फुकट्यांवर कारवाईसाठी टीसींना दिलासा! आता दंड वसुलीसाठी UPI/ QR कोडचा होणार वापर.

* शेअर बाजाराचा इतिहास, BSEच्या लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप प्रथमच ३०० लाख कोटींच्या पुढे.

* कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू; आक्षेपार्ह घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाचा निर्णय

* वैयक्तिक माहिती सुरक्षा विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पावसाळी अधिवेशनात सादर होणार.

* विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मिळणार एक्स्ट्रा 10 मिनिटे

* शिक्षण हे प्रगतीचे द्वार, प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करून यश संपादन करावे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

* प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत नोंदणी करावी

* व्हॉट्सअ‍ॅपवर लिंक पाठवून विविध टास्क देऊन गंडा, दोन आरोपींना गुजरात येथून अटक, 8 दिवसांची पोलिस कोठडी. 

* शिंदे-फडणवीसांनी नवा भिडू सोबत घेतल्याने बच्चू कडू नाराज ; बोलून दाखवली खदखद.

* राष्ट्रपतींच्या विदर्भ दौऱ्यात मुख्यमंत्र्याची गैरहजेरी ; चर्चांना उधाण.

* कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला विक्री करुन साडेतीन कोटींची फसवणूक, आठ जणांवर गुन्हा दाखल.

* बीआरएस पुढील आठवड्यात जळगावात करणार धमाका ; माजी आमदार धोंडगे यांचे सूचक विधान

* दगडूशेठ गणपती मंदिराजवळील बॉम्बस्फोट प्रकरण : फेरतपासाबाबत याचिकेवर दोन महिन्यात निर्णय घ्या - मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश,                 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या