🌟परभणीत जगद्गुरू शिवाचार्य महाराज यांचे स्वागत अन् भव्य शोभायात्रा.....!


🌟शोभायात्रा संपल्यानंतर भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी दूपारी धर्मसभा आयोजित करण्यात आली🌟


परभणी (दि.२३ जुलै २०२३) - जगत्गुरू श्री शैल्य श्री.श्री.श्री सिंहासन जगद्गुरु १००८ डॉ.चन्ना सिद्धाराम पंडिताराद्य शिवाचार्य महास्वामी यांची गजानन विभूते यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणावरून शहरातून  सकाळी अकरा वाजता मुख्य मार्गाने विसावा कॉर्नर ,नारायण चाळ, गांधी पार्क,छत्रपती शिवाजी चौक,आंध्रा बँक,कॉर्नर विद्यानगर बेलेश्वर मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. महिला व पुरुष  असा मोठा जनसमुदाय  या शोभायात्रेत उपस्थित होता. शोभायात्रा संपल्यानंतर भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी दूपारी धर्मसभा आयोजित करण्यात आली.

त्या सभेत जगत्गूरू महाराजांचा प्रवचन कार्यक्रम होणार आहे. रात्री प्रताप नगर येथील गजानन विभुते यांच्या निवासस्थानी जगद्गुरु महाराज मुक्कामी राहणार आहेत सोमवार २४ जूलै रोजी रोजी शिवसेना माजी सभापती गंगाप्रसाद आनेराव विद्यानगर नंतर बाळासाहेब ठाकरे नगर खासदार बंडु जाधव यांच्या निवासस्थानी जगद्गुरु महाराज हे जाणार आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या