🌟पुर्णा नगर परिषदेत बोगस पदोन्नतीने मांडला उच्छाद : लायकी नसलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ता ?


🌟नगर परिषद प्रशासनात ढवळाढवळ करणारे आजी/माजी भ्रष्ट राजकारणीच ठरत आहेत घोटाळेबाज कर्मचाऱ्यांचे तारणहार🌟 


🌟बोगस कर्मचारी भरती प्रकरणा नंतर आता बोगस पदोन्नती प्रकरणही उजेडात🌟

 🌟मुख्याधिकारी युवराज पौळ कर्तव्याशी एकनिष्ठता दाखवून कारवाईचा बडगा दाखवतील काय ?🌟

पुर्णा (विशेष वृत्त) - पुर्णा नगर परिषदेत तत्कालीन मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या काळात नगर परिषदे अंतर्गत घडलेले बोगस कर्मचारी भरती प्रकरणाला काही महिण्याचा कालावधी उलटला असतांनाच आता पुर्णा नगर परिषदेत बोगस पदोन्नती प्रकरण देखील उघड झाले असून लायकी नसतांना देखील आर्थिक हितसंबंध जोपासत पदोन्नती देण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तीकेच्या चौकशी वरून उघड झाल्यानंतर त्याचे डिमोशन करण्यात आल्याचे उघड झाले असून अश्याच प्रकारे आणखी तिन तृतीयश्रेणी कर्मचारी ज्यांची लायकी नसतांना देखील त्यांना  पदोन्नती देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पुर्णा नगर परिषद प्रशासनांतर्गत कामकाजाचा वाढलेला व्याप पाहता मागीला अनेक वर्षांपासून अनेक पदे रिक्त आहेत परंतू पदभरती करण्याबाबत जिल्हा नगर प्रशासन उदासीन असल्याने त्या पदांचा कारभार प्रभारी कुठल्याच प्रकारची शैक्षणिक गुणवत्ता अर्थात लायकी नसलेल्या तृतीयश्रेणी/चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडे सोपवून प्रशासकीय कारभाराचा खेळखंडोबा केला जात असून यामुळे पुर्णा नगर परिषद सतत वादाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहे त्यांही पेक्षा गंभीर बाब म्हणजे असे काही कर्मचारी देखील नगर परिषदेत आहेत जे एकाच विभागात मागील दशकापासून ठाण मांडून बसले असून नगर परिषदे अंतर्गत घोटाळे करण्यात तरबेज झाले आहेत.

पुर्णा नगर परिषद प्रशासनात अगोदरच प्रशासकीय कारभार स्वच्छ व सुनियोजित चालविण्यास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता असताना, आता शैक्षणिक पात्रता नसलेल्या  कर्मचाऱ्यांना सर्व निकष डावलून पदोन्नती दिली जात आहे. कनिष्ठ पदापासून ते वरिष्ठ लिपिक पदांपर्यंत विभागांतर्गत पदोन्नती देण्याचा आर्थिक बाजार प्रगती पथावर असल्याचे दस्तुरखुद्द कर्मचाऱ्यांतूनच जोरदार चर्चा होतांना ऐकावयास मिळत आहे. या सर्व भ्रष्ट कारभाराचा प्रशासकीय आणि नागरी सेवांवर गंभीर परिणाम होत असल्याने प्रामाणिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. पूर्णा शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कुरघोड्यांच्या राजकारणाहून अधिक भयंकर राजकारण पूर्णा नगर परिषदेतील विविध विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. नगरपरिषदेच्या कामकाजाचा आवाका पाहता गेली अनेक वर्षे शेकडो पदे रिक्त आहेत. 

त्यात पदभरती करण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याने त्या पदांचा कारभारप्रभारी पदांवरून हाकला जात आहे. प्रभारी पदांवरही पात्र उमेदवारांची वाणवा असल्याने शैक्षणिक पात्रता नसलेल्यांकडे कारभार सोपवण्यात आला आहे.त्यातही विशिष्ट राजकीय पक्ष अथवा पुढाऱ्यांच्या सहकार्याने पदोन्नती मिळाल्यानंतर प्रशासनाऐवजी त्या नेत्यांसोबत संबंधित कर्मचारी अधिक प्रामाणिक राहत असल्याचे दिसते. त्यामुळे नगरपालिकेत अधिकाऱ्यांचे गट निर्माण झाल्याने त्याचा गेली अनेक वर्षे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. हे सर्व सुरू असताना गेल्या काही महिन्यांपासून शिपाई पदापासून ते कनिष्ठ ते वरिष्ठ लिपिक अशा सर्व पदांसाठी विभागांतर्गत पदोन्नतीसाठी नगर परिषदेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाजार मांडल्याची चर्चा आहे. शैक्षणिक पात्रता नसताना त्यांना पदोन्नती देण्यात आली या सर्व कामांसाठी  5लाख रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा नगरपालिकेत रंगली आहे. मात्र अपात्र व्यक्तींची विविध विभागांत विविध पदांवर नियुक्ती होत असल्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजांवर आणि नागरी सेवांवर होत असल्याचे बोलले जात आहे. 

याबाबत आस्थापना आणि कार्यालयीन अधीक्षक विभागांमधील कारभाराकडे नवीन मुख्याधिकारी पोळ यांची डोळेझाक होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नगरपालिकेत पात्रता नसलेल्या अनेकांना निकष डावलून पदोन्नती दिल्याचे उदाहरण असून या विभागातील भोंगळ कारभाराबाबत नवीन मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे नईमखान छोटेखान हे नगर परिषद पूर्णा याकार्यालयात लिपीक या पदावर कार्यरत होते, परंतु सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परिक्षण यांनी सेवा पुस्तीकेची पडताळणी केली असता त्यात निदर्शनास आले की,टंकलेखन 30/40 व संगणक परिक्षा शासनाच्या नियमानुसार सेवा पुस्तीकेमध्ये नोंद नव्हती,त्यामुळे त्यांना शिपाई या मुळ पदावर पाठविण्यात आले. सदरील वर्ग (3) च्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, व जिल्हा प्रशासन अधिकारी नगर प्रशासन विभाग यांची दिशाभूल करुन तत्कालीन अस्थापना प्रमुख यांच्या सोबत चेरीमेरी घेऊन पदोन्नती /नियुक्ती देण्यात आली.

त्यानुसार आपल्या नगर परिषदेमध्ये सर्व लिपीकांची शासकिय नियमानुसार शैक्षणिक पात्रतेची (टंकलेखन 30/40, MS-CIT) पडताळणी करुन सेवा पुस्तीकेमध्ये नोंद आहे का ? याची सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परिक्षक परभणी या कार्यालयात पडताळणी करुन घेण्यात यावी तसेच सर्व कर्मचाऱ्यांना नगर पालिका अधिनियम 1965 च्या नियमानुसार वर्ग (3) च्या अपात्र कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक पात्रतेनुसार मुळ पदावर पाठविण्यात यावे. अशी अशी मागणी विनोद सग्रेल यांनी  निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या