🌟नांदेड जिल्ह्यातील ६१ पत्रकारांना १० लाखाच्या अपघाती विम्याचे सुरक्षा कवच प्रदान....!


[नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यक्षम अध्यक्ष तथा दैनिक प्रजावाणी चे संपादक श्री गोवर्धन बियाणी यांचा पत्रकार बांधवांच्या वतीने काल नांदेड येथे शासकिय विश्रामग्रहात सत्कार करण्यात आला. पत्रकारांसाठी १० लाखाचा अपघात विमा ही योजना त्यांनी राबवत आहेत.. त्याबद्दल धन्यवाद म्हणून बियाणी यांचा गौरव करण्यात आला..]

🌟नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक🌟

नांदेड (दि.०२ जुलै २०२३) :- पत्रकारांना दिवसभर बातम्यांसाठी धावपळ करावी लागते.वाढत्या स्पर्धेमुळे होणाऱ्या धावपळीत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकार सभासदांचा अपघाती विमा काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून  त्याची सुरुवात आज शुक्रवारी ( ३० जून ) करण्यात आली आहे.   पोस्टाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६१  पत्रकारांना दहा लाख रुपये अपघाती विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. 


नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पहिल्याच कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सर्व पत्रकार सभासदांचा अपघाती विमा काढण्याची संकल्पना अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी मांडली होती. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ३० जून रोजी सकाळी १० वाजता शिवाजीनगर भागातील नाना नानी पार्क येथे पहिल्याच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

* या विमा कवचद्वारे जिल्हा संघाने पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टाकले पहिले पाऊल :-

दहा लाखांचा हा अपघाती विमा असणार असून कोणी जखमी झाल्यास या विम्याच्या माध्यमातून त्याला उपचाराचा खर्चही मिळणार आहे. यावेळी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. प्रदीप नागापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच्या शिबिरात उपस्थित ६१  पत्रकार सभासदांचा विमा काढण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी,कार्याध्यक्ष संतोष पांडागळे  आणि सचिव राम तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर उपाध्यक्ष प्रल्हाद लोहेकर, शहराध्यक्ष शिवराज बिच्चेवार, सहसचिव सुरेश काशिदे व किरण कुलकर्णी, प्रशांत गवळे, प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे, कृष्णा उमरीकर, रवी संगनवार, नरेश दंडवते, महेंद्र देशमुख, अमृत देशमुख, राजकुमार कोटलवार, दिपंकर बावस्कर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पोस्टाचे डाक अधीक्षक आर. व्ही. पाळेकर, डाक निरीक्षक वाय. एच. काटोले, कार्यकारी अधिकारी आर. आर. नागठाणे, आर. बी. भालेराव, डाक पाल के. बी. टेकाळे, जी. एन. स्वामी, पी. एम. सोळंके, आवेश पठान आदि पोस्टाचे अधिकारी,आयुष्यमान भारत योजनेचे समन्वयक तसेच बजाज अलियांज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या शिबिरात विमा कवच प्रदान करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून योग्य ते मार्गदर्शन देखील केले. दरम्यान जिल्हा पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

__________________________________________________टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या