🔹गंगाखेडला कॉंग्रेस-भाकपसह मित्रपक्षांचे निवेदन 🔹
गंगाखेड (दि.२१ जुलै २०२३) : मणिपुर राज्यात दोन महिलांची नग्न धींड काढण्यात आली. हा प्रकार सबंध राष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा आहे. या घटनेतील आरोपींना तात्काळ देहदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रमुख मागणीसह विविध स्थानिक मागण्यांचे निवेदन गंगाखेड कॉंग्रेस- भारतीय कम्युनिस्ट पार्टी सह विविध पक्षांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
मणिपुर घटनेसह अश्लील व्हिडीओ प्रसारीत झालेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याचबरोबर गंगाखेड तालुक्याचे रद्द करण्यात आलेले हेक्टरी ६८०० रूपये अनुदान तातडीने वाटप करावे, शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी अनुदान मंजुर करावे, दुष्काळाच्या पार्शभूमीवर २५ टक्के अग्रीम विमा मंजुर करावा, रानडुकरास जंगली प्राणि घोषीत करून केरळ राज्याच्या धर्तीवर जखमींना हेक्टरी मदत जाहिर करा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, घरगुती गॅसवर पन्नास टक्के अनुदान द्यावे आदि प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, भाकपाचे संयोजक कॉम्रेड योगेश फड, कांदलगावचे माजी सरपंच ॲड राजू देशमुख, ईसादचे माजी सरपंच तथा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ भालेराव, बसपाचे शिवराज पैठणे, शेकापचे भाई गोपीनाथराव भोसले, रोहिदास लांडगे, दस्तगीर सय्यद, सुपा येथील उपसरपंच लक्षण घोलप, ग्रा.पं. सदस्य गंगाधर घोलप, अज़ीम शेख आदिंसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ऊपस्थित होते. सकाळपासून होत असलेल्या पावसामुळे आज होणार असलेले गोंधळ आंदोलन पुढील आठवड्यात केले जाणार असल्याची गोविंद यादव, योगेश फड यांनी यावेळी सांगीतले.....
0 टिप्पण्या