पुर्णा (दि.२१ जुलै २०२३) - पूर्णा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कोष्याध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम यांचा वाढदिवस आज श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे श्री उत्तमरावजी कदम यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जेष्ठ संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ दत्तात्रेय वाघमारे यांच्या हस्ते शॉल तसेच पुष्पहार घालून श्री.उत्तमरावजी कदम यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव श्री गोविंद कदम, संचालक डॉ विनय वाघमारे, संचालक श्री सूर्यकांत कदम यांनीही श्री उत्तमरावजी कदम यांचा सत्कार केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शिवसांब कापसे यांनी उपस्थितांना श्री उत्तमरावजी कदम यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून दिला.
यावेळी उपप्राचार्य डॉ गजानन कुरुंदकर, पर्यवेक्षक श्री उमाकांत मिटकरी, व्यवसाय अभ्यासक्रमाचे उपप्राचार्य श्री आबाजी खराटे , कार्यालयीन अधीक्षक श्री बाळासाहेब कुलकर्णी, डॉ रवी बर्डे, डॉ संजय दळवी, डॉ राजू शेख, डॉ रवींद्र राख तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ संजय दळवी , कालिदास वैद्य आणि सुभाष भालेराव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या