🌟हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीत माजी नगराध्यक्षांच्या पतीने केला पत्रकारावर हल्ला.....!


🌟पत्रकार संरक्षक कायद्या नुसार गुन्हा दाखल🌟

हिंगोली : कळमनुरी येथील दैनिक लोकमत समाचार चे पत्रकार मोहम्मद रफीक यांच्यावर हल्ला करण्यात आला.. आरोपीस तातडीने अटक करावी अशी मागणी पत्रकार कळमनुरीने केली आहे.. 

कळमनुरी येथील दैनिक *लोकमत समाचार चे तालुका प्रतिनिधी मोहम्मद रफीक* यांनी दिनांक *एक जुलै 2023 रोजी दैनिक लोकमत समाचार मध्ये कळमनुरी शहरात होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या बांधकामा बद्दल बातमी छापली होती*.. अशी बातमी का लावली? म्हणून कळमनुरीच्या माजी नगराध्यक्षा चे पती आरोपी फारूक  सुभान बागवान यांनी त्यांना दिनांक ६ जुलै २०२३ रोजी सकाळी मारहाण केली व पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या या संदर्भात कळमनुरी पोलीस निरीक्षक मुंडे यांची कळमनुरी शहरातील पत्रकारांनी मागणी केल्याने श्री मुंडे ह्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमनुरी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला *गुन्हा नों.क्रमांक ०४११/ २०२३ अन्वये भादवि ३२३, ५०४, ५०६  तसेच  महाराष्ट्र प्रसार माध्यम  व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक ) अधिनियम  2017 चे कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 👊👊👊👊👊

तात्काळ अटक करा🙋‍♂️

प्रदीप कोकडवार

पत्रकार🙋‍♂️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या