🌟परभणी शहरातील श्री.महालक्ष्मी ग्राहक पेठ या दुकानात झालेल्या धाडसी चोरीचा अवघ्या पाच तासात लावला छडा...!


🌟स्थानिक गन्हे शाखेची पोलिस अधिक्षक आर.रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी कारवाई ३.५७ लाखांचा मुहेमाल जप्त🌟


🌟घटनेतील आरोपी देखील अटक करण्यात देखील स्थागुशाला यश🌟

परभणी (दि.०९ जुलै २०२३) - परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या श्री महालक्ष्मी ग्राहक पेठ या दुकानात काल दि.०७ जुलै २०२३ रोजी रात्री झालेल्या घरफोडीच्या घटना परभणी जिल्हा  स्थानिक गुन्हे शाखाच्या अधिकारी व अंमलदारांनी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती आर.रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ०५ तासात उघडकीस आणून एकुण ३५७३४८/- रुपयांचा मुदेमाल आरोपीसह ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली परभणी शहरात जिंतूर रोडवर असलेल्या श्री महालक्ष्मी ग्राहक पेठ या दुकानात दि.०७ जुलै २०२३ रोजी रात्री घरफोड़ी झाल्याची तक्रारी पोलीस स्टेशन नानलपेठ येथे आल्यावरून गुन्हा रजिष्टर नंबर २५४/२०२३ कलम ४६१,३८० भादवी प्रमाणे अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी या घडलेल्या गुन्ह्याची गंभीर दखल घेत तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे व सायबर सेलचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत स्थागुशाचे पो.नि.वसंत चव्हाण यांनी तात्काळ दोन पथके तयार करून परभणी शहरातील सी.सी. टी.व्ही.च्या माध्यमातून व गोपनीय माहिती आधारावरून या घटनेतील आरोपी निष्पत्न करून गुन्हा उघडकीस आणने कामी रवाना केले परभणी स्थागुशाच्या पथकांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहून व गोपनिय माहितीच्या आधारे अवध्या पाच तासाच्या आत सदर आरोपीतांची माहिती काढून आरोपी सुभाष अंबादास धुमाळ राहणार धनुबाई प्लॉट परभणी यास ताब्यात घेतले असता त्याने इतर दोन आरोपींच्या सहकार्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असून गुन्ह्यात चोरी गेलेला मु्देमाल देखील हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्यात चोरीचा माल नेण्यासाठी आरोपीतांनी वापरलेले वाहन व चोरीस गेलेला सुका मेवा (काजू, बदाम,लवंग विलायची इ.) व घरफोडीसाठी आवश्यक साहित्य लोरखंडी टामी, एका बाजूस निमूळते असलेले लोखंडी पाईप, पकड, गजावळीची गळ, वायर कटर व स्क्र ड्रायव्हर तसेच लोखंडी धारदार पाते असलेले खंजीर असा एकूण ०३ लाख ५७ हजार ३४८ रुपयांया मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपी व मु्देमाल पुढ़ील तपासकामी पोलिस स्टेशन नानलपेठ येथे हजर केला आहे.

सदरची कारवाई जिल्ह्याच्या कर्तव्यकठोर पोलीस अधिक्षक आर.रागसुधा मेंडम,अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे व स्थागुशाचे पोलिस निरिक्षक व्हि.डी.चव्हाण परभणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक नागनाथ तुकडे,पोलिस उपनिरिक्षक साईनाथ पुयड,पोलिस उपनिरिक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अमलदार बि.टी.तुपसुमंदरे,विलास सातपुते,रवि जाधव, परसोडे, रंगनाथ दुधाटे सचिन भद्गे, जयश्री अव्हाड, हरीचंद्र खुपसे, दिलावर खान, सिध्दश्वर चाटे, मधुकर ढवळे, राम पौळ नामदेव डुब, शेख रफिक, गायकवाड, निलेश परसोडे, हनुमान ढगे, निकाळजे सर्व ने. स्था.गुशा. परभणी तसेच सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कौटकर, संतोष मोहोळे यांचे पथकानी केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या