🌟जिंतूर येथील आठवडी बाजार पुर्ववत जुन्या जागेत सुरू करा.....!


🌟अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१३ जुलै २०२३) : - येथील आठवडी बाजार कोरोना काळात बंद करण्यात आला होता. सदरील बाजार पूर्ववत  जुन्याच जागेवर चालू करावा अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.

शहरातील नगरपरिषद जुन्या कार्यालयात च्या  बाजूला दर्गा हजरत मिस्किन शहा परिसरात जिंतूर येथील आठवडी बाजार भरत होता. परंतु कोरोना च्या  काळात शासनाच्या आदेशानी सदरील बाजार बंद करण्यात आला होता. तेव्हापासून शहरात आठवडी बाजार भाजी मंडई व एलदरी रोडवर भरवल्या जात आहे. सदरील बाजार जुन्याच जागेवर भरवावा अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 निवेदनावर आकाश चराटे ,युसुफ कबीर, सचिन रायपत्रीवार,सय्यद जाबेर  मुल्ला, युवराज घनसावंध, शेख यासीन करीम ,अखलाख काजी आदींच्या साक्षर आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या